Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामोबाईल नसलेले विद्यार्थी घेतायेत 'ऑफलाईन शिक्षण'; 'मुलांच्या घरी शिक्षण'ची सर्वत्र चर्चा

मोबाईल नसलेले विद्यार्थी घेतायेत ‘ऑफलाईन शिक्षण’; ‘मुलांच्या घरी शिक्षण’ची सर्वत्र चर्चा

वैभव पवार | खामखेडा

फांगदर शाळेतील मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘मुलांच्या घरी शिक्षण’ ह्या उपक्रमास देवळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीष बच्छाव, सरपंच संजय मोरे, केंद्रप्रमुख शिरीष पवार यांनीे नुकतीच भेट दिली….

- Advertisement -

मुलांचे थांबलेले शिक्षण सुरु करण्यासाठी शाळेतील शिक्षक मोबाईल नसलेल्या मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचात सामाजिक अंतर ठेवून, योग्य ती खबरदारी घेऊन कधी घराच्या ओसरीत,पडवीत,गोठ्यात ,झाडाखाली,अंगणवाडीच्या रिकाम्या खोलीत तर काही ठिकाणी अंगणात ओट्यावर पंधरा जुन पासुन आठवड्यातून दोन दिवस वर्ग भरवत ज्ञानदानाचे काम सुरू आहे.

या मुलांपर्यंत शिक्षण पोहचावे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संजय गुंजाळ , शिक्षक खंडू मोरे हे या वस्तीवर जाऊन या विद्यार्थ्यांना अध्यापन करतात.

शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमाच्या माध्यमातून फांगदर शाळेच्या मुलांच्या घरी शिक्षण या ऑफलाइन वर्गास पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी भेट दिली.

विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शाळा बंद असताना देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनाच्या देखील सूचना केल्या.

शाळा बंद,शिक्षण चालु या उपक्रमातंर्गत गाव तेथे वाचनालय या उपक्रमातून वस्तीच्या परिसरातील एका पालकाच्या घरात वाचनालयचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वस्तीवर अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध होणार आहेत.

शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या थांबलेल्या शिक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत या गोष्टींचे यावेळेस मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन मोरे उपाध्यक्ष प्रकाश शेवाळे,दीपक मोरे,संजय बच्छाव,भाऊसाहेब देवरे, भास्कर वाघ यासह पालक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या