Thursday, April 25, 2024
Homeनाशिकस्थायी समितीची 17 फेब्रुवारीला बजेट सभा

स्थायी समितीची 17 फेब्रुवारीला बजेट सभा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेला करोना साथीमुळे उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम पुढील वर्षातील बजेटमध्ये दिसणार आहे. चालु वर्षात घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर उत्पन्नातील व उद्दीष्टात झालेली घट लक्षात घेता नवीन वर्षातील उत्पन्न वसुली उद्दीष्टात घट होण्याची शक्यता आहे. या एकुण पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव हे आयुक्तांचे मागील वर्षातील सुधारित व नवीन वर्षातील बजेट स्थायी समितीला सादर करणार आहे…

- Advertisement -

नाशिक महापालिकेचे सन 2020 – 21 या वर्षाचे सुधारित बजेट व सन 2021 – 22 या नवीन वर्षाचे बजेट आयुक्त जाधव येत्या 17 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांना सादर करणार आहे. चालु वर्षात करोनामुळे उत्पन्नात मोठी घट झाली असुन यामुळे नवीन वर्षातील विकास कामांना ब्रेक लागणार आहे.

पुढील वर्षात महापालिका सार्वत्रिक निवडणुक होणार असुन या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात चांगली कामे व्हावे ही नगरसेवकांची अपेक्षा पुर्ण होणार नसल्याचे दिसत आहे. नाशिक महापालिकेचे सन 2020 – 21 करिता 2161 कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. यात जीएसटी अनुदान 1081 कोटी, नगररचना कर 170 कोटी, घरपट्टी 146 कोटी व पाणीपट्टी 65 कोटी रुपये अशाप्रकारे वसुलीचे उद्दीष्ट असतांना त्यात करोनामुळे लक्षणिय घट झाली आहे. यामुळे आता नवीन वर्षाच्या बजेटला कात्री लागणार असुन उत्पन्न वसुली उद्दीष्टात 100 कोटींची घट होण्याची शक्यता आहे.

तसेच नवीन वर्षाच्या बजेट मध्ये आता आयुक्तांकडुन आरोग्य, शिक्षण यांच्या फोकस केला जाणार असल्याची शक्यता आहे. यात विशेषत: महापालिकेच्या बिटको रुग्णालयात पदवीत्तर मेडीकल कॉलेज, महापालिकेचे स्मार्ट स्कुल अशांसह आरोग्यांसंदर्भात मोठी तरतुद केली जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात नगरसेवकांच्या पदरात फारसा निधी पडेल अशी शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या