नाशिक । प्रतिनिधी

करोनाला अटकाव घालण्यासाठी राज्य शासनाने आजपासून रात्री ते सकाळपर्यंत संचार बंदी लागू केली आहे. नाशिक शहर व मालेगाव शहर हद्दित रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी राहिल, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लागू केले आहेत.

हे आदेश आजपासून लागू करण्यात आले असून ५ जानेवारी २०२१ पर्यंत लागू असतील. कर्फ्यूकाळात आदेशाचे भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणा

कर्फ्यूकाळात अत्यावश्यक सुविधा वगळता घराबाहेर पडण्यास बंदी असेल. नागरिकांनी आदेशाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून हे आदेश जारी करण्यात आले.

नाताळ अर्थात खिसमस सण अवघ्या दोन दिवसांवर तर थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपले आहे. एक दोन दिवसांतच नाताळच्या सुट्यांना सुरूवात होते आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गांनाही उद्यापासून सुटी मिळणार आहे.

याशिवाय कर्मचारी वर्गालाही शुक्रवार (दि. २५) पासून सलग सुट्या असल्याने मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. करोना संसर्गाचे संकट अजूनही कायम असून ब्रिटनमध्ये नव्या करोना संकटाने उच्छाद मांडला आहे.

सुटीच्या कालावधीत लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले तर संसर्गाचा उद्रेक होण्याची भीती आहे. या एकूणच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्री ते पहाटे कालावधीत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाप्रशासन, महापालिका, पोलिस व जिल्हापरिषद यांनी संयुक्त बैठक घेत हा शहर हद्दीत संचारबंदीचा निर्णय घेतला.

सुट्यांच्या कालावधीत लोक अधिक संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने शहरात संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाप्रशासनाने या पार्श्वभुमीवर बैठक घेउन नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी