Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकला जोडणार समृद्धी महामार्ग; इथे होणार इंटरचेंज

नाशिकला जोडणार समृद्धी महामार्ग; इथे होणार इंटरचेंज

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला (Nagpur Mumbai Samrudhi Highway) नाशिक शहर जोडण्यासाठी जवळपास सोळा किलोमीटरचा विशेष मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी २४९ कोटी ६७ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

या कामाचा डीपीआर (DPR) म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इंटरचेंज मार्गामुळे नाशिक थेट समृद्धी महामार्गाला जोडले गेल्याने दळणवळणाची गती तर वाढणार आहेच, शिवाय गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे.

मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ (Mumbai Agra national highway number 3) वरील वाडीवऱ्हे (Vadivarhe) ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र महामार्गावर (Hindurudaysamrat Balasaheb Thakaray maharashtra highway) मौजे भरवीर (कवडदरा फाट्यापर्यंत) हा प्रस्तावित इंटरचेंज मार्ग तयार करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीच्या २५ ऑगस्टला झालेल्या बैठकीत या मार्गास मान्यता देण्यात आली. त्याचा शासन निर्णय सोमवारी ( दि . ६ ) जारी करण्यात आला आहे . त्यानुसार हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवण्यात आली आहे.

दोनपदरी रस्ता तयार करण्यासाठी याच महामंडळाला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या जोड रस्त्यासाठी २४९ कोटी ६७ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या