युपीएससी परीक्षेत नाशिकच्या नकुलचे दुहेरी यश
मुख्य बातम्या

युपीएससी परीक्षेत नाशिकच्या नकुलचे दुहेरी यश

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवीन नाशिक | प्रतिनिधी Nashik

मूळचे सिन्नर येथील पण सध्या नाशिक शहरात वास्तव्यास असणारे नकुल राजेंद्र देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात अलेल्या नागरी सेवा परीक्षा 2019 मध्ये संपूर्ण देशात 489 व क्रमांक पटकावला.

यापूर्वी भारतीय वनसेवा परीक्षा -2019 मध्येही नकुल याने देशात 53 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

अत्यंत कठीण व प्रतिष्ठित समजणाऱ्या या परीक्षा एकाच वर्षात उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नकुल यांनी आपले प्राथमिक शिक्षण नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे इगतपुरी येथील नूतन मराठी विद्यालय, व इयत्ता ५ वी महात्मा गांधी विद्यालय येथे केले.

त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय, खेडगाव येथे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुण्यातील एका संस्थेमधून अभियांत्रिकीची पदवी संपादित केली.

त्यामध्ये सुद्धा त्यांनी पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर मोठा पगार घेऊन खाजगी नोकरी करता आली असती पण प्रशासनात जाऊन समाजासाठी कार्य करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

अत्यंत प्रतिभावंत असणाऱ्या नकुल देशमुख याने केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली.

पहिल्या तीन प्रयत्नात मुलाखती पर्यंत जाऊन सुद्धा अपयशाने निराश न होता आपल्या प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीने यावर्षी दुहेरी यश संपादन केले.

त्यांचे वडील सध्या वनविभागात लेखापाल या पदावर इगतपुरी येथे कार्यरत आहेत व आई गृहिणी आहेत. त्यांच्या या स्वप्नपूर्ती साठी त्यांचे आई-वडील, लहान भाऊ, मित्र व शिक्षक वृंद यांनी त्यांना मोलाची साथ दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com