अभियांत्रिकी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी

अभियांत्रिकी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी
एमपीएससी परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या परिक्षांसाठी नाशिक हे परिक्षा केंद्र असले तरी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षेसाठी नाशिक येथे केंद्र नव्हते. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते....

एमपीएससीकडून नाशिक केंद्राला लवकरच मंजुरी मिळणार

त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरिक्षेसाठी पुढील वर्षांपासून नाशिक येथे केंद्र सुरु करण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिले आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरिक्षेसाठी नाशिक केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अनेक शिष्ठमंडळांनी खा. गोडसे यांची भेट घेवून केली होती.

विद्यार्थ्यांच्या व्यथा समजून घेतल्यानंतर सदर परिक्षेसाठी नाशिक केंद्र व्हावे, यासाठी मागील महिन्यात खा.गोडसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रशासनाची मुंबई कार्यालयात भेट घेतली. यावेळी आयोग प्रशासनाने लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही खा. गोडसे यांना दिली होती.

खा. हेमंत गोडसे यांची मागणी न्यायीक असल्याने अखेर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा केंद्रासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पुढील परिक्षेच्या वेळेपासून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षेसाठी नाशिक येथे केंद्र सुरु करण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे आयोगाचे सहसचिव अताडे यांनी सांगितले.

या केंद्राच्या सोयीमुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

परिक्षा पुढे ढकलली

१ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या परिक्षेचे नियोजन पूर्ण झाले होते. मात्र करोना संसर्गामुळे ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुढील नियोजनात परिक्षा केंद्राच्या यादीत मुबंई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यांच्यासह नाशिकचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com