गंगेत बुडालेल्या दोघांना वाचवले; मोहीम फत्ते, स्थानिकांकडून यंत्रणेचे स्वागत

गंगेत बुडालेल्या दोघांना वाचवले; मोहीम फत्ते, स्थानिकांकडून यंत्रणेचे स्वागत

नाशिक | दि. २१ प्रतिनिधी Nashik

आज (दि २१) सकाळी गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पुन्हा एकदा विसर्ग वाढविणार (Water Discharge Increased) असल्याची खबर आली होती. यामुळे तीन हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग (Water discharge) नदीपात्रात होत होता. याच वेळी पंचवटी पोलीस ठाण्यात (panchvati police station) फोन खणाणला. दोघे गोदावरी नदीपात्रात (Godavari River) अडकल्याचे सांगण्यात आले....

पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले होते. अशातच याच परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता बोटीसह जवानांनी पाण्यात उड्या घेतल्या. अवघ्या काही मिनिटात दोघांचेही प्राण वाचविण्यात यश आले. पाण्यात बुडत असलेल्या दोघांनाही सुखरूप पाण्याबाहेर आणल्यानंतर स्थानिकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

नाशिक शहरात व परिसरात (Nashik city and dam water catchment area) सध्या मोठया प्रमाणात पाऊस होत आहे. तसेच नाशिक शहरात परिसरात या पुढील काळात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने पाऊस जास्त झाल्यानंतर काही अनुचित प्रकार घडला तर गंगाघाट किनारी व परिसरात जिवीतहानी व वित्तहानी होवू नये या करीता आयोजित केलेले ते मॉकड्रील होते.

ही मोहीम नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik CP Jayant Naiknaware) यांच्या सुचनेनंतर उपआयुक्त अमोल तांबे (DCP Amol Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे (ACP Gangadhar Sonawane), नाशिक मनपा पंचवटी विभाग (NMC Panchvati Division) यांच्या उपस्थितीत गाडगे महाराज पुलाजवळील गौरी पटांगण आज (दि २१) दुपारी बारा ते एकच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस प्रशासनासह नाशिक महानगर पालिका, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा समावेश होता.

अशी होती कुमक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक रंजित नलवडे, यांच्यासह मनपा विभागाचे राबडीया, आहीरे, कानडे, आपत्ती व्यवस्थापनाचे देशपांडे, भालेकर, सिव्हील डिफेन्स, बावस्कर यांच्यासह पंचवटी, पोलीस स्टेशनचे ०६ पोलीस अधिकारी, १६ पुरुष व महिला पोलीस अंमलदार, मनपाचे ०८, सिव्हील डिफेन्सचे १०, आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालयातील ०८ व १ रुग्णवाहिका, ०१ मोठे अग्निशमनचे वाहन, ०१ मोठे सिव्हिल डिफेन्सचे वाहन, पंचवटी पोलीस स्टेशनची ०२ मोठी वाहने या मॉकड्रीलमध्ये सहभागी होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com