Monday, April 29, 2024
Homeनाशिकहुडहुडी वाढली; नाशिक, निफाडमध्ये पारा घसरला

हुडहुडी वाढली; नाशिक, निफाडमध्ये पारा घसरला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

हवामान खात्याने (weather update by imd) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) गारपीटीचा (snow fall) इशारा दिलेला असतानाच आज तपमानात कमालीची घट झाली. यात नाशिकचा पारा १४.८ अंशांवरून थेट ६.६ अंशावर घसरला तर निफाडचा पारा १० अंशावरून थेट ५.५ अंशांवर घसरलेला सकाळी बघायला मिळाला….

- Advertisement -

वातावरणात हलकीशी हवा असल्यामुळे झोंबणाऱ्या थंडीचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पावसाचा व गारपीटीचा (Rain and snow fall warning by imd) अंदाज वर्तवला होता. (cold in nashik)

यानंतर पाकिस्तान (pakistan) आणि गुजरातमधून (Gujrat) आलेल्या धुळीच्या वादळामुळेदेखील तपमानाचा पारा घसरल्याचे दिसून येत आहे. येत्या दोन दिवसांत आणखी थंडीत घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात (Nashik District) झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या अचानक थंडीने नाशिकर गारठले आहेत. घसरत असलेल्या पार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली असून द्राक्ष बागायितदर (Grapes producer farmers in problem due to cold in nashik) चिंतेत दिसून येत आहेत.

गेल्या वर्षी याच दिवसांत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. देशाच्या उत्तरेकडील केंद्र शासित प्रदेश व शेजारील राज्यात बर्फवृष्टीमुळे राज्यातील तपमान घसरले होते. यादरम्यान, निफाडमधील पार २.४ अंशांपर्यंत घसरलेला होता. यावेळी अनेक भागात दवबिंदूदेखिल गोठ्ल्याचे दिसून आले आले होते.

नाशिक जिल्ह्यात थंडीचा मुक्काम वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नाशिकमध्ये दरवर्षीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झालेली आहे. त्यामुळे वाढलेल्या थंडीचा मोठा परिणाम कांदा पिकावर (cold will affect onion and grapes) होणार आहे. तर नाशिकमधील द्राक्षांवरदेखील वाढलेल्या थंडीचा विपरीत परिणाम होणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

आणखी थंडी वाढली तर द्राक्ष मन्यांना तडे जाणे, पाने कोरडी होणे असे प्रकार वाढणार आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी भल्या पहाटे बागेतगवत जाळून उष्णता तयार करू लागली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या