नाशिक । प्रतिनिधी

देशातील उत्तरेत बर्फवृष्टी सुरू असल्याने अनेक भागात जनजीवन विस्कळती झाले आहे. याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आलेली आहे. आज सकाळी नाशिकचा पार ९.१ अंशांवर तर निफाडचा पार ८.२ अंशांवर स्थिरावला. गेल्या आठ दिवसांत हे तपमान जवळपास दहा अंशांनी घसरले आहे....

राज्यात गेल्या दहा दिवसापुर्वी किमान तापमान 20 - 21 पर्यंत गेल्यानंतर अवकाळी पाऊस झाल्यानंतर थंडी गायब झाली होती. आता मात्र पारा 13 ते 14 अंशावर खाली आल्याने पुन्हा एकदा थंडी सुरू झाली आहे.

हंगामातील सर्वात नीचांकी तपमानाची आज नोंद झाली आहे. नाशिकला गेल्या 7 डिसेंबर रोजी पारा 10.5 अंशापर्यंत खाली आला होता. नंतर 11 डिसेंबर रोजी किमान तापमान पुन्हा 20 अंशावर गेले होते.

आता गेल्या दहा दिवसात पुन्हा एकदा नाशिकचा पारा ९.१ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. तर निफाडमध्येही तपमानाची घट झाली असून पारा ८.२ अंशांवर स्थिरावला आहे.