Video : शरद पवार, तुम्हीच सांगा मुंबईतले भुजबळांचे घर कुणाचे?

किरिट सौमय्या : भुजबळांवर केले आरोप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आर्म स्ट्रॉंग (Armstrong) कंपनीत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपला पैसा पांढरा केला. भुजबळ मुंबईत ज्या नऊ मजली घरात राहतात ती कुणाची आहे? असा सवाल उपस्थित करत भाजप नेते किरिट सौमय्या यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळ मुंबईत ज्या घरात राहतात ते घर कुणाचे आहे हे शोधून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले,...

सौमय्या यांनी बुधवारी वसंतस्मृती (Vasant Smruti BJP Office Nashik) कार्यालयात पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाॅण्ड्रिंगचे गंभीर आरोप केले.-मुंबईत बांधलेल्या करोडो रुपयांच्या घरासाठी ला पैसा कुठून आणले. मुंबईत देखील मी भुजबळ यांच्या भुजबळ महाल ची पाहणी करायला जाणार आहे.

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली नामी आणि बेनामी संपत्ती जाहिर करावी. त्यांची १२० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.आज मी भुजबळ यांची आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची (Armstrong Energy Nashik) पाहणी केली.या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला.आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैशा पांढरे केले असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भुजबळ यांच्या निगडीत अनेक बोगस कंपन्या आहेत. भुजबळांची पनवेल, नाशिक, अंधेरी, सांताक्रूझ याठिकाणी असलेली मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली अशी माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com