कालिका दर्शनासाठी टोकन कायम; शुल्काचा निर्णय मागे

कालिका दर्शनासाठी टोकन कायम; शुल्काचा निर्णय मागे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिराच्या (Kalika Temple in Nashik) दर्शनासाठी १०० रुपयांचे टोकन (Token) घ्यावे लागणार असल्याचा अजब निर्णय देवस्थानने घेतला होता. यानंतर या निर्णयावर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. दरम्यान, आज देवस्थानकडून हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. निर्णय मागे घेतला असला तरीदेखील भाविकांना ऑनलाईन टोकन काढूनच दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागेल अशी माहिती देवस्थानकडून देण्यात आली आहे....

कालिका दर्शनासाठी टोकन कायम; शुल्काचा निर्णय मागे
Video : शाळा, मंदिरे व थिएटर सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणतात...

करोना महामारीनंतर (Covid Pandemic) प्रथमच घटस्थापनेपासून (Ghatsthapana) सर्व मंदिर खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर नाशिकचे ग्रामदैवत (Nashik Gramdaivat)असलेल्या कालिका मंदिर देवस्थानच्या (Kalalika Mandir Trust) वतीने घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरत मुंबई नाका पोलिस ठाण्यात (Mumbai Naka police station) पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी कालिका मंदिर विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तांची बैठक घेतली.

त्या बैठकीत मंदिर परिसरामध्ये गर्दी रोखण्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारावे असा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, शहरातील विविध संघटनांनी या शुल्कावरून प्रचंड टीका सुरु केली होती. मंदिर प्रशासनावर टीका होत असल्याचे दिसून येताच आज कालिका मंदिर विश्वस्त मंडळाची बैठक झाली.

कालिका दर्शनासाठी टोकन कायम; शुल्काचा निर्णय मागे
नाशिक विभागातील तलाठ्यांच्या दप्तराची होणार तपासणी

या बैठकीत शुल्क आकारुन दर्शन घेण्याबाबत अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. विश्वस्त मंडळांच्या विश्वस्तांनी एकमुखाने दर्शनासाठी शुल्क न करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अधिकृत घोषणा विश्वस्त केशव पाटील (Keshav Patil) यांनी केली.

कालिका मंदिर विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी स्वागत केले असून हा हिंदुत्ववादी संघटनांचा मोठा विजय असल्याचे प्रतिक्रया या संघटनेकडून देण्यात आली आहे.

कालिका दर्शनासाठी टोकन कायम; शुल्काचा निर्णय मागे
नवरात्रोत्सवात नाशिकच्या 'या' तालुक्यात देऊळबंदच; हे आहे कारण...

असे घ्या टोकन

http://www.kalikamandirtrust.org या वेबसाईटला जा.

इथे गेल्यानंतर तुम्हाला ई-टोकन बुकिंग नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून आपण माहिती अपडेट करू शकता. यानंतर तुम्हाला तुमचे टोकन प्राप्त होईल. आपल्याला दिलेल्या वेळेत जाऊन दर्शन घेऊ शकतात.

Related Stories

No stories found.