Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअसंघटितांना असुरक्षित करणारे कायदे रद्द करा - पाटकर

असंघटितांना असुरक्षित करणारे कायदे रद्द करा – पाटकर

नाशिक । प्रतिनिधी

महामारीच्या भीतीने पूर्वसूचना न देता लॉकडाऊन केल्यामुळे असंघटीत क्षेत्रातील कामगार, कारागीर यांना सुरक्षित करण्यासाठी दोन लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, अशा सर्वांना दरमहा दहा हजार रुपयांचे हस्तांतरण करावे….

- Advertisement -

तसेच लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना विश्वासात न घेता शेतकरी, कामगार विरोधी घेतलेले तीन निर्णय सरकारने त्वरित रद्द करावे अशी मागणी जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयच्या नेत्या मेधाताई पाटकर यांनी नाशिक येथे केले.

शहरातील हुतांत्मा स्मारकात नाभिक, असंघटीत कामगार, टपरीधारक, घरेलू कामगार, सफाई कामगार, बारा बलुतेदार कारागीर व प्रदूषण मुक्त नद्या यासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

देशाचे नव्वद टक्क्या पेक्षा जास्त असलेल्या असंघटीत कामगारांना आज देखील धान्य वितरण व्यवस्थेचा आधार असल्याचे सांगत पाटकर म्हणाल्या, तेव्हा आता तरी या व्यवस्था अधिक लोकांपर्यंत पोहोचतील, अंमलबजावणीसाठी पुरेसे मानव संसाधन देऊन सक्षम कराव्यात.

कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्पोरेट च्या ताब्यात देण्याचे षड्यंत्र करणारे कायदे रद्द करुन आंतरराज्य स्थलांतरीत मजूर कायदा, असंघटीत मजूर संरक्षण कायदा, 2009 चा हॉकर्स कायदा यांची ताबडतोब अंमलबजावणी होण्यासाठी त्या त्या कारागीर, कामगारांचे महामंडळ स्थापन करून त्यांची नोंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

देशभर नद्या जिवंत ठेवण्यासाठी उत्तरांचल येथे मात्री सदन आणि भारतभर सुरु असलेल्या चळवळीला पाठींबा देण्यासाठी 14 सप्टेंबरला गोदावरी नदी काठी अभियान करण्याचे पाटकर यांची आज जाहीर केले.

येत्या पाच सप्टेंबरला देशभर गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तिसर्‍या स्मृती दिनी पाचशे हून अधिक महिला संघटना, संस्था, व्यक्ती यांचे कडून ‘आज उठाव केला नाही तर (अगर आज उठे नही तो)’ हे अभियान केले जाणार आहे.

ऑनलाईन शिक्षणाला विरोध करण्यासाठी तसेच गरिबांना अधिक गरीब, साधन विरहीत करणार्‍या नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी उपक्रम केले जाणार आहे. बैठकीला नद्या संवर्धन अभियानाचे निशिकांत पगारे, रोहित कानडे, योगेश बर्वे, प्रा. सोमनाथ मुठाळ, राहत फौंडेशनचे आसिफ शेख, आयजोद्दिन काझी; युवाचे नितीन मते, नाभिक कारागीर समन्वय समितीचे अविनाश लोखंडे, संजय गायकवाड, नितीन वाघ, कैलास राऊत, एनएपीएमच्या गीतांजली चव्हाण, डॉ. अर्चना तोंडे, प्रतिक ठाकूर, रोहिणी ठाकूर, अनिता पगारे, हिंद मजदूर किसान पंचायतीचे शांताराम चव्हाण, बांधकाम मजूर संघटनेचे रतन सांगळे, सीमा चित्ते, गीताई फौंडेशनचे मनोहर आहिरे, रमेश साळवे, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.

देशभर 14 सप्टेंबरला अभियान

यांना सद्या रोजगार उपलब्ध नसल्यामुळे किमान जगण्यासाठी कुटुंबाला दरमहा दहा हजार रुपये बँक खात्यावर वर्ग करावेत, तसेच छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी मोफत किंवा अत्यल्प दरात भांडवलासाठी दहा हजार रुपये द्यावे ह्या मागणीसाठी देशभर येत्या 14 सप्टेंबरला अभियान होणार असल्याची घोषणा त्यांनी ह्या बैठकीत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या