नाशिकमधील 'या' तालुक्यांतील होम क्वारंटाईन बंद

वेळप्रसंगी बाजारसमित्याही होऊ शकतात बंद
नाशिकमधील 'या' तालुक्यांतील होम क्वारंटाईन  बंद

नाशिक । Nashik

गेल्या काही दिवसांपासून निफाड (Niphad), सिन्नर (Sinanr) आणि येवला (Yeola) तालुक्यात करोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढता वाढता वाढत आहे. त्यामुळे गृहस्थानबद्ध (Home Quarantine) पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. रुग्ण बाधित आढळून आल्यास त्यास आता कोविड केअर सेंटरमध्ये किंवा जवळच्या रुग्णालयात दाखल करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister Chhagan Bhujbal) यांनी दिली...

आज करोना आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.(Collector Office Nashik) यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, येवला, सिन्नर आणि निफाड तालुक्यात निर्बंध लागू झाल्यामुळे जवळच्या तालुक्यातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

तीन तालुके सोडले तर इतर तालुक्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिक सतर्कता बाळगली जात आहे.

या तालुक्यांमध्ये रुग्ण आढळल्यास यापुढे होम क्वारंटाईन (Quinine) राहण्यास परवानगी दिली जाणार नाही. तर, अशा रुग्णांना थेट रुग्णालयांमध्येच दाखल करावे लागेल असे सांगण्यात आले आहे. करोनाचं संकट अजूनही टळलेले नाही. नागरिकांनी नियम पाळायला हवेत.

जर हीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढे बाजारपेठाही बंद कराव्या लागतील असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.

Related Stories

No stories found.