Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto : रामसेतू पुलाला लागले पाणी; गोदावरीला आला पूर

Photo : रामसेतू पुलाला लागले पाणी; गोदावरीला आला पूर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणातून (Gangapur Dam) आज दुपारी विसर्ग वाढविण्यात आला. (Water Discharge increased) तीन वाजता हा विसर्ग ८ हजार क्युसेकपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. गंगेवरची सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली आहेत…

- Advertisement -

दुतोंड्या मारुती बुडालेला आहे. तर रामसेतू पुलाच्या (Ramsetu Bridge) नजीक पाणी पोहोचल्यामुळे दुथडी भरून वाहणारी गोदावरी नजर पुरत नाही इथवर दिसू लागली आहे. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गंगेवरील पाणी वाढले. हे पाणी रामसेतू पुलाला पाणी लागण्यासाठी काही इंच पातळी बाकी राहिली आहे.

गाडगे महाराज पुलावरून (Gadge Maharaj Bridge) बघितले तर अहिल्यादेवी होळकर पुलापर्यंत (Ahilyadevi Holkar Bridge) आणि होळकर पुलापासून गाडगे महाराज पुलापर्यंत भले मोठे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहताना दिसून येत आहे.

यंदाच्या हंगामातील पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नाशिककरांनी होळकर पुल, गाडगेमहाराज पूल परिसरात मोठी गर्दी केलेली दिसून आली.

दुपारी पावणेतीन वाजताची गंगेवरील स्थिती

नदीकाठी असलेले हॉटेल्स अर्धे बुडाले, जीवरक्षक दलाचे जवान तैनात

नाशिक पोलीस, आपत्ती निवारणचे जवान आणि जीवरक्षक दलाचे कर्मचारी नदीकाठी असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

होळकर पुलाखालील दृश्य…

- Advertisment -

ताज्या बातम्या