Video : गोदावरीला पूर; नाशिककरांची नदीकाठी तोबा गर्दी

Video : गोदावरीला पूर; नाशिककरांची नदीकाठी तोबा गर्दी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रामवाडी पूल (Ramwadi Bridge) परिसरातून व्हिक्टोरिया पुलापर्यंत (Victoria Bridge) म्हणजेच अहिल्यादेवी होळकर पुलापर्यंत (Ahilyadevi Holkar Bridge) संथ वाहत असलेली गोदामाई (Godavari River) अचानक गांधी तलावात (Gandhi Talav) प्रवेश करताच रौद्ररूप धारण करते. रामसेतूला पाणी लागले आणि सोशल मीडियात (Social Media) एकच गवगवा पिटला गेला. ज्यामुळे नाशिककरांनी गोदातीरी पूर पाहण्यासाठी गर्दी केली. प्रशासनाकडून आवाहन करुनही अनेकांनी पुरात पोहण्यासाठी उड्या घेतल्या तर अनेकांना धोक्याच्या ठिकाणी उभे राहत सेल्फीही काढले...

गंगापूर धरण क्षेत्रात गेल्या २ दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सकाळी साडेआठ वाजेपासून टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येत आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास रामसेतू पुलाला पाणी लागले. परिसरातील व्यावसायिकांची दुकाने हलवण्यासाठी धावपळ उडाल्याचे दिसून आले. पाण्याच्या पातळीचा अंदाज नदीकाठी राहणारी मंडळी घेताना दिसून आली.

प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी, जीवरक्षक दलाचे जवान नदीकाठी अनुचित प्रकार घडू नये यासाठी उभे दिसून आले. पोलिसही पाण्यात उतरून सेल्फी काढणाऱ्यांना दंडुका दाखवत होते.

Related Stories

No stories found.