Sunday, April 28, 2024
Homeनाशिकसोमवारी घोटी टोलनाक्याला ग्रामस्थ ठोकणार टाळे; हे आहे कारण

सोमवारी घोटी टोलनाक्याला ग्रामस्थ ठोकणार टाळे; हे आहे कारण

घोटी | वार्ताहर

मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोलनाक्याला येत्या सोमवारी (दि. १८) रोजी टाळे लावणार असल्याचे अधिकृत पत्र नुकतेच घोटी ग्रामपालिकेने टोलनाका प्रशासनाला दिले आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रामपालिका हद्दीत असलेला घोटी टोलनाका ग्रामपालीकेला घरपट्टी कराची रक्कम देत नसल्याने त्याला टाळे ठोकण्याचा ग्रामपालिकेने इशारा दिला आहे.

याबाबत ग्रामपालिकेने टोलनाका प्रशासनास तसे लेखी पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम २४ महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० भाग २ पोट नियम १५ अन्वये शासन निर्णय ११ डिसेंबर १९१५ नुसार निवासी व व्यवसायिक बांधकामाची कर आकारणी केल्यानुसार टोलनाका,

स्टोअररूम, टोलनाका शेड मिळकत क्रमांक ३८९८ ची मागील थकबाकी ७०६, ५४० व चालु ८५,५८० एकुण ७९२,३२० रक्कम भरलेली नाही.

याबाबत घोटी ग्रामपालिका कार्यालयाने २५ सप्टेंबर २०२० रोजी नोटिसीद्वारे टोलनाका प्रशासनाला कळविले होते. मात्र, अद्याप पर्यंत रक्कम अदा करण्यात आली नसल्यामुळे कारवाईचा बडगा ग्रामपालीकेने उगारला आहे.

एकूण ७ लाख ९३ हजार ३२० रक्कम वसुल करण्यासाठी घोटी ग्रामपालिका सोमवारी (दि. १८) घोटी येथील टोलनाक्यास टाळे ठोकणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी धुंदाळे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या