Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात बाप्पांचे जल्लोषात आगमन; ढोल ताशांच्या गजरात परिसर निनादला

नाशकात बाप्पांचे जल्लोषात आगमन; ढोल ताशांच्या गजरात परिसर निनादला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लाडक्या बाप्पांचे आज घराघरांत मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावात आगमन झाले. आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नाशिककरांनी गणपतीच्या स्टालवर गर्दी केली होती. कुणी दुचाकी घेऊन तर कुणी चारचाकीने गणपती घेण्यासाठी आले होते.

- Advertisement -

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, विघ्नहर्ता श्री गणपती Shri Ganpati बाप्पांंच्या आगमनाचा दिवस आहे. पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा Ancient Traditionआजही कायम आहे. आजपासून दहा दिवस गणरायाचे घरोघऱी भक्तीभावाने पूजन केले जाणार आहे. घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होत आहे.

यंदाही गणेशोत्सवावर Ganesh Festival करोनाच्या corona तिसर्‍या लाटेचे सावट आहेच. ते बघता सरकारने लावून दिलेल्या काही नियमात बाप्पांचे आगमन होत आहे. काही मंडळांनी गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीही पूर्ण झाली आहे. गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे पूजा साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपार्‍या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपार्‍या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ यांची सर्वत्र रेलचेल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या