तीन वर्षांच्या जुळ्या मुलांसह बापानेही संपवले जीवन

तीन वर्षांच्या जुळ्या मुलांसह बापानेही संपवले जीवन

सिद्ध पिप्री | वार्ताहर Siddha Pimpri

ओझर पिप्री (Ojhar Pimpri Area) शिवारात तीन मृतदेह आढळून (Three Deadbody found) आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. येथील गट नं १६२१ मध्ये ग्रामपंचायत हद्दीत दोन मुलांसह वडीलांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त आहे...

मयत शंकर गुलाब महाजन (वय 3४, रा यावल जळगाव, हल्ली मुक्काम भगतसिंग नगर (डांबरवाडी) ओझर, तर दोन जूळी मुले पृथ्वी वय ३ वर्ष आणि प्रगती वय 3 वर्ष अशा जुळया मुलाना घेऊन वडील दोन दिवसांपूर्वी दुचाकीने कुणालाही काहीही न सांगता निघून गेले होते.

सिद्ध पिंपरी (Siddh Pimpari) परिसरातील दगडाच्या खाणीनजीक ही मोटारसायकल आढळून आली आहे. तसेच जुळ्या मुलांसह बापाचाही मृतदेह आढळून आला आहे.

आज सकाळी मृतदेह खाणीतील पाण्यावर तरंगताना दिसून आल्याने घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस पाटील कैलास ढिकले यांनी नाशिक तालुका पोलीस स्टेशनला (Nashik Taluka Police Station) माहिती दिली.

यावेळी पोलीस निरीक्षक आहिरराव, पी एस आय आंबोरे, पीएसआय कोठावदे यांच्यासह विक्रम कडाळे, जगदीश जाधव, कैलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.

दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर ते नाशिक शासकिय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी (Nashik Civil Hospital) पाठवण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com