Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनिवाने बारीत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

निवाने बारीत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

निवाने | वार्ताहर

निवाणे ते मुलूकवाडी रस्त्यादरम्यान असलेल्या निवाने बारीत तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे…

- Advertisement -

काल (दि २६ ) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि 25) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास निवाणे ता. कळवण येथील तरुण शेतकरी विजय रामदास आहेर (वय 41) याने देवळा तालुक्याच्या हद्दीत असलेल्या निवाणे बारी घाटातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयत विजय आहेर यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

निवाने येथील प्रगतिशील शेतकरी रामदास त्र्यंबक आहेर यांचे जेष्ठ चिरंजीव होते. मयत विजय आहेर यांचा मनमिळाऊ स्वभाव व सामाजिक बंधिकली जपत अनेक व्यवसायात मार्गक्रमण करणारे एक ध्येयवेड्या तरुणांची अशी घटना घडल्याने निवाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या