Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला; मंत्री रावसाहेब दानवेंचा नातलग असल्याची चर्चा

नाशकात इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला; मंत्री रावसाहेब दानवेंचा नातलग असल्याची चर्चा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पाटाच्या पाण्यात एका इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Engineering student dead body found in nashik) तालुक्यातील सैयद पिंपरी (Sayyad Pimpri) येथे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेला विद्यार्थी देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Ravsaheb Danave) यांचा नातलग असल्याचे समजते….

- Advertisement -

नाशिकच्या महापौरांना सोडवा लागणार ‘रामायण’ बंगला; ‘हे’ आहे कारण

अभिषेक कैलास खरात (Abhishekh kailas kharat) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो के के वाघ इंजिनियरिंग कॉलेज मध्ये कॉम्पुटर सायन्सच्या (Computer Science) शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वीच त्याचा चुलत भाऊ सुरज खरात याने अभिषेक बेपत्ता (Missing) असल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात (adgaon police station) दिली होती.

युक्रेनमध्ये नाशिकचे अजून १७ जण अन् एक श्वान अडकले; तिघे सुखरूप परतले

पोलीस या विद्यार्थ्याचा शोध घेत असतानाच आज तालुक्यातील सैय्यद पिंप्री येथील पाटाच्या पाण्यात मृतदेह आढळून आला. यानंतर ग्रामीण पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला.

यानंतर हा मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (PM) पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल (Post mortem report) आल्यानंतरच या विद्यार्थ्याच्या मृत्युचे कारण समोर येणार आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नातलग असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या