Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिक्षणाधिकारी डॉ झनकरचा कारागृहातील मुक्काम वाढला

शिक्षणाधिकारी डॉ झनकरचा कारागृहातील मुक्काम वाढला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लाचखोर प्रकरणातील संशयित आरोपी डॉ वैशाली झनकर (Dr Vaishali Veer Zankar) यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने दोन दिवस सुनावणी पुढे ढकलल्यामुळे डॉ झनकरचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे….

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी डॉ झनकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. (Education officers discharged from the hospital) यानंतर त्यांची रवानगी थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

त्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि १८) रोजी सुनावणी होणार होती; मात्र, वकील गैरहजर राहिल्याने जामिन अर्जाची सुनावणी आज (दि २०) रोजी होणार होती. सहआरोपी वाहनचालक ज्ञानेश्वर येवले (Driver Dnyaneshwar Yeole) आणि प्राथमिक शिक्षक पंकज देशमाने (Primary Teacher pankaj deshmane) यांचा जामिन न्यायालयाने मंजूर केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या