डॉ. झनकर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल

डॉ. झनकर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ठाण्यातील एका शिक्षणसंस्थेकडून आठ लाखांची रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर (Nashik Education officer Dr Vaishali Zankar Veer) यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...

दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जामिनासाठी त्यांनी अर्ज केला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

डॉ. झनकर (Dr Vaishali Zankar) या लाच प्रकरण उजेडात आल्यानंतर फरार झाल्या होत्या. यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. (Nashik Court)

न्यायालयाने शनिवारी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यादरम्यान प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर सोमवारी (दि १६) रोजी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

डॉ झनकर (Dr Vaishali Zankar) रुग्णालयात असल्याने पोलीस चौकशीला वेळ मिळाला नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. यानंतर पुन्हा न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, आज (दि. १७) रोजी दुपारी डॉ. झनकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत केली आहे. जर न्यायालयाने अर्ज फेटाळला तर त्यांना पुढील १४ दिवस नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असे आहे मूळ प्रकरण...

ठाणे जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या चार शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले होते. त्यानुसार शाळेतील ३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची पदनिश्चिती करून त्यांचे नोव्हेंबर २०२० पासून थकीत वेतन काढून देण्यासाठी तसेच मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे वेतन पुढे नियमित सुरू ठेवण्यासाठी डॉ वैशाली झनकर यांनी ९ लाख रुपयांची लाच मागितली होती.

त्यांच्या वतीने प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी तक्रारदाराशी संपर्क केला होता. तडजोडीअंती ८ लाख रुपये स्वीकारण्याचे वैशाली झनकर यांनी मान्य केले होते. वीर आणि दशपुते यांनाही ताब्यात घेत तिघांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या कारवाईनंतर एसीबीने तिघाही संशयितांच्या घरी छाप घालत झाडाझडती घेतली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com