...अखेर शिक्षणाधिकारी डॉ. झनकरची रवानगी सेंट्रल जेलमध्ये; दिवसभरात काय झालं जाणून घ्या

...अखेर शिक्षणाधिकारी डॉ. झनकरची रवानगी सेंट्रल जेलमध्ये; दिवसभरात काय झालं जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लाचखोर प्रकरणातील संशयित आरोपी डॉ वैशाली झनकर (Dr Vaishali Veer Zankar) यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली नाही. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच (Education officers discharged from the hospital) त्यांची रवानगी थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. कार्डिओलॉजिस्टकडून त्यांची तपासणी करण्यात आली असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास यांनी सांगितले... (Dr Kishor Shrinivas)

...अखेर शिक्षणाधिकारी डॉ. झनकरची रवानगी सेंट्रल जेलमध्ये; दिवसभरात काय झालं जाणून घ्या
शिक्षणाधिकारी डॉ झनकर नातेवाईकांच्या गराड्यात; पोलिसांची बघ्याची भूमिका

दरम्यान, आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती; मात्र, वकील गैरहजर राहिल्याने जामिन अर्जाची सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे. सहआरोपी वाहनचालक ज्ञानेश्वर येवले (Driver Dnyaneshwar Yeole) आणि प्राथमिक शिक्षक पंकज देशमाने (Primary Teacher pankaj deshmane) यांचा जामिन न्यायालयाने मंजूर केला आहे.

दरम्यान, त्यांना काल (दि.१७) रोजी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मिळाली दिली होती; त्यानंतर लगेचच त्यांनी न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज ठेवला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर त्यांनी आज जामीन अर्ज दाखल केला परंतु त्यांचे वकील गैरहजर राहिल्याने यावर सुनावणी शुक्रवारी (दि.20) होणार आहे.

दरम्यान, सहआरोपी वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज देशमाने यांचा जामिन न्यायालयाने मंजूर केला आहे. प्रत्येकी रुपये २५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला असून दोघांना सोडण्यात येणार आहे.

...अखेर शिक्षणाधिकारी डॉ. झनकरची रवानगी सेंट्रल जेलमध्ये; दिवसभरात काय झालं जाणून घ्या
रँगिग काय आहे ? यासंदर्भातील कायदा काय?

संशयित आरोपी डॉ वैशाली झनकर यांची प्रकृती खालावल्याने काल (दि १७) जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज (दि.१८) त्यांना अधिक तपासणी साठी संदर्भ रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, त्यांच्या भोवती त्यांचे पती आणि इतर नातेवाईकांनी गराडा घातल्याचे दिसून आले. रुग्णवाहिकेपर्यंत डॉ. झनकर व्हिलचेयरवर आल्या. मात्र, त्यानंतर त्या स्वतः उभ्या राहून रुग्णवाहिकेमध्ये चढल्याने उपस्थित आश्चर्यचकित झाल्याचे यावेळी दिसून आले. डॉ झनकर यांच्यासोबत असलेले पोलीसही यावेळी बघ्यांच्या भूमिकेत दिसले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com