Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यादेशातील पहिली डबल ‘कॉर्ड स्टेम सेल’ प्रत्यारोपण शस्रक्रिया नाशकात यशस्वी

देशातील पहिली डबल ‘कॉर्ड स्टेम सेल’ प्रत्यारोपण शस्रक्रिया नाशकात यशस्वी

नाशिक । प्रतिनिधी

देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया येथील डॉ. प्रितेश जुनागडे यांच्या लोटस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली, अशी माहिती डॉ. प्रितेश जुनागडे यांनी दिली…

- Advertisement -

डॉ. जुनागडे म्हणाले,संगमनेरमधील 7 वर्षाच्या मुलीला अप्लास्टिक निमिया होता, यामध्ये शरीरातील स्टेम सेल्स मधील बिघाडामुळे शरीरात लाल पेशी, पांढर्‍या पेशी आणि प्लेटलेट्स तयार होत नाहीत.

यामुळे त्या रुग्णाला गेल्या 2 वर्षांपासून वारंवार रक्त आणि प्लेटलेट रक्तसंक्रमण करण्यात येत होते. अशा गंभीर आजारावर उपचार म्हणजे दुसर्याचे स्टेम सेल्स देणे जेणेकरून ते रक्त पेशी तयार करू शकतील.

व हे शक्य आहे जर रुग्णाला कोणी स्टेम पेशी देऊ शकेल असा दाता असेल. सामान्यत: सख्खे भावंड स्टेम पेशी दान करू शकतात परंतू भावंडांच्या स्टेम पेशी जुळण्याची शक्यता केवळ 25 टक्के असते .

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या 7 वर्षीय रुग्णाची एक लहान बहीण होती, जीची स्टेम सेल कॉर्डच्या रूपात ती 100 टक्के जुळली जाईल आणि भविष्यात त्या रूग्णासाठी वापरता येईल या आशेने जन्माच्या वेळी साठवली होती पण दुर्दैवाने ही स्टेम सेल फक्त 50 टक्के जुळत होती म्हणून त्यांचा वापर करता आला नाही.

पण सुदैवाने लाईफ सेल बँकेत अशा दोन संग्रहित कॉर्ड स्टेम सेल्स होत्या ज्याचा वापर करण्यात आला. सामान्यतः असे 1 युनिट वापरले जाते परंतु डॉक्टरांना अशा 2 युनिट्सची आवश्यकता होती कारण एका युनिटच्या स्टेम सेल्सचे प्रमाण पुरेसे नव्हते, म्हणून दोन्ही स्टेम सेल्स वापरण्यात आल्या.

दोन्ही कॉर्ड स्टेम सेल युनिट्स 90टक्के एकमेकांशी आणि रुग्णाशीही जुळल्या. परंतु या शिवाय अन्य पर्याय नसल्याने डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपणाचा निणर्य घेऊन ऑपरेशनच्या 22 दिवसानंतर संक्रमित स्टेम पेशी काम करू लागल्या आणि बालिकेस जीवनदान मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या