Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक शहरात वधू बैलगाडीने ११ किमी प्रवास करून पोहोचली सासरी...

नाशिक शहरात वधू बैलगाडीने ११ किमी प्रवास करून पोहोचली सासरी…

नवीन नाशिक | प्रतिनिधी

आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगून शेतकरी वर्गाबद्दल समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवविवाहीत दांपत्याने आगळे वेगळे पाऊल उचलले. वधू आणि वराने नाशिकच्या रस्त्यांवरून ११ किमीचा प्रवास केला. यावेळचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सर्वत्र व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

नवीन नाशिक हा मुळातच शेतकरी वर्गाचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात समाविष्ट असलेल्या अंबड, मोरवाडी, पाथर्डी, उंटवाडी व कामठवाडे या भागाचा समावेश आहे.

या पंचक्रोशीत अजूनही अनेक कष्टकरी आणि शेतकरी वास्तव्यास आहेत. मोरवाडी परिसरात राहणारे मोरवाडी गावातील मूळ रहिवासी अमोल नामदेव सोनवणे यांचा विवाह हर्षदा नामदेव गामने यांच्यासोबत औरंगाबाद रोड येथे उत्साहात पार पडला.

लग्न ठिकाणापासून मोरवाडी येथे निवासस्थानी येण्यासाठी या नवविवाहित दाम्पत्याने कोणत्याही चारचाकी प्रवास टाळला.

थेट बैलगाडीचा वापर करून घरी येण्याचा निर्णय दोघांनी घेतला. सोशल डिस्टन्ससिंग तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून मोजक्या लोकांमध्ये झालेल्या विवाहानंतर हे नवविवाहित दांपत्य चक्क बैलगाडीतून घरी आले.

यामुळे शेतकरी वर्गाचा महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या बैलगाडीचा वापर करून दाम्पत्य घरी आल्याने हा विषय नवीन नाशिक परिसरात चर्चेचा बनला होता.

यावेळी सोनवणे आणि गामने कुटुंबीयांच्या आदर्श विवाह सोहळ्याने संपूर्ण नवीन नाशिककरांचे लक्ष केंद्रित केले होते.

या आदर्श विवाह सोहळ्यास औरंगाबाद नाका येथून द्वारका, मुंबई नाका, राणे नगर मार्गे मोरवाडी येथे परतताना 11 किलोमीटर चा प्रवास बैलगाडी ने केला.यावेळी वाहतूक सुरळीत करण्याचे नियोजन विशाल डोखे व गोकुळ नागरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या