नाशिकमधील 'जलसंपदा'चे कार्यालय कुठेही हलणार नाही - जयंत पाटील

नांदूरमध्यमेश्वर आणि भावली धरण परिसरात पर्यटन केंद्र म्हणून विकास करणार
नाशिकमधील 'जलसंपदा'चे कार्यालय कुठेही हलणार नाही - जयंत पाटील

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील जलसंपदा विभागाचे (Water Resources Department) कार्यालय कुठेही हलणार नाही. जलसंपदा मंत्री (Cabinate Minister of Department of Water Resources) म्हणून मी अशी नाशिककरांना ग्वाही देतो असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी सांगितले. नाशिकमधील जलसंपदा विभागाच्या कामांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते....

ते म्हणाले, नाशिकमधील जलसंपदा विभागाचे कार्यालयात हलविण्यात येणार आहे असे बोलले जात असेल तर आज मी जलसंपदा मंत्री म्हणून अशी ग्वाही देतो की, एकही जलसंपदा विभागाचे कार्यालय येथून हलविण्यात येणार नाही.

तसेच नाशिकमधील पर्यटनाची व्याप्ती आणखी वाढविली जाणार आहे. यात नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) येथील पक्षी अभयारण्यासह इतर सुखसोयी पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच भावली धरण (Bhavali Dam) परिसरही पर्यटनाचा केंद्रबिंदु होत आहे. त्यामुळे याठिकाणीदेखील पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील रस्त्यांचा जो विषय आहे तोही येणाऱ्या काळात मार्गी निघेल असेही त्यांनी सांगितले. देवसाने (Devsane), मांजरपाडा (Manjarpada) प्रकल्पातून गुजरातला जाणारे पाणी वळवून महाराष्ट्र आणण्याचे जे प्रयत्न झालेत आहेत त्याचे कौतुक करावे तितके कमी असल्याचे सांगत पाटील यांनी भुजबळांचे कौतुक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com