Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमधील 'त्या' दंत महाविद्यालयातील करोनाबाधित मुलींची संख्या आणखी वाढली

नाशिकमधील ‘त्या’ दंत महाविद्यालयातील करोनाबाधित मुलींची संख्या आणखी वाढली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील दंत महाविद्यालयातील (Dental College Panchvati Nashik) १७ विद्यार्थिनी करोनाबाधित आढळून आल्याची घटना काल रात्री घडलेली असतानाच आणखी दहा विद्यार्थिनींची करोना टेस्ट पाॅझिटिव्ह (Covid test positive) आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे….

- Advertisement -

महापालिकेच्या सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके (NMC Assistant health officers dr ajita salunkhe) यांनी देशदूतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, महापालिकेची पथके दंत महाविद्यालयात रवाना झाली असून मुलींच्या संपर्कात आलेल्यांच्या टेस्ट केल्या जात आहेत.

अधिक माहिती अशी की, शनिवारी वसतिगृह व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थिनींच्या घशाचे स्वब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात काही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यानंतर मनपा पथकाने वसतिगृहात जाऊन पाहणी केली. ज्या विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले. या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे.

गरज भासल्यास विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी मनपा कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, करोनाबाधित आढळून आलेल्या मुली बाहेरगावाहून आलेल्या असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले होते.

या विद्यार्थिनी कुठून आल्या, कुणाकुणाच्या संपर्कात आल्या याबाबतची माहिती घेऊन महापालिका प्रशासन टेस्ट करत आहेत. दुसरीकडे काल आणखी काही मुलींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी आज आणखी १० मुली करोना बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे करोनाबाधित मुलींची संख्या आता २७ वर पोहोचली आहे.

घटनास्थळी महापालिकेची पथके रवाना झाली आहेत. एकीकडे लहान मुलांचे लसीकरण आजपासून सुरु झाले असतानाच मोठ्या संख्येने एकाच महाविद्यालयात मुली बाधित आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या