आरोग्य विभागाचा गलथान कारभार; मुलाला कोव्हॅक्सिनऐवजी दिली कोविशील्ड लस

आरोग्य विभागाचा गलथान कारभार;  
मुलाला कोव्हॅक्सिनऐवजी दिली कोविशील्ड लस

नाशिक/पाटोदा | प्रतिनिधी/वार्ताहर Nashik

आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्ह्यात २५ आणि शहरात ६ आरोग्य केंद्रांवर करोना प्रतिबंधक लस टोचण्यासाठी सुरुवात झाली. येवला तालुक्यात (Patoda Tal Yeola) कोव्हॅक्सिनऐवजी कोविशील्ड (Covishield vaccine given instead of covacin) लस मुलाला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलाला देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचे समजते....

ओमायक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Omicron outbreak) शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रतिसादात सकाळपासून लसीकरणाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास मात्र येवला तालुक्यातील पाटोदा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात एका १६ वर्षीय मुलाला कोविशील्ड लसीचा डोस देण्यात आल्याची घटना घडली.

लहान मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लस द्यायचे ठरलेले असताना कोविशील्ड लस दिलीच कशी गेली यावरून आता खो व खो दिले जात आहेत. महिला पारिचारिका सांगतात की, जर कोविशील्ड लस द्यायची नव्हती तर तो स्टाक आम्हाला पाठवला का?

दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी परिचारीकेची चुकी असल्याचे सांगत आहेत. यावरून आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. ज्या मुलाला लस देण्यात आली तो मुलगा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मुलगा असल्याचे समजते. यामुळे वातावरण अधिकचे तापले आहे.

या मुलाला वैदकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अद्याप त्याला कुठलाही त्रास होत नसल्याचे समजते आहेत.

एकाच दिवशी 15 ते 18 वयोगटातील मुलांना एका ठिकाणी व लसीकरणाचा दुसरा डोस असणाऱ्या लाभार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी असे एकाच आरोग्य केंद्रात लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे अनवधानाने ही लस दिली गेली आहे. परंतु, त्याने लसीकरण झालेल्या लाभार्थ्याच्या आरोग्यावर काही परिणाम होणार नाही असे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले.

Related Stories

No stories found.