Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात रूग्णसंख्या घटली; २४ तासांत 'इतके' पॉझिटिव्ह

नाशकात रूग्णसंख्या घटली; २४ तासांत ‘इतके’ पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण घटनत चालले आहे. मागील चोवीस तासात 866 रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा 79 हजार 280 वर पोहचला आहे. तर जिल्ह्यात 17 रूग्णांचा मृत्यू झाला आहे…

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 866 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 447 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 53 हजार 417 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 355 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 21 हजार 500 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 50 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 3 हजार 831 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 532 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 364 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 68 हजार 409 वर पोहचला आहे.

करोनामुळे आज 17 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 9 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 7 तर जिल्हा बाह्य 1 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 427 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत आहे. 24 तासात 1 हजार 512 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 1 हजार276, ग्रामिण व गृह विलगीकरण 203, मालेगाव 17, जिल्हा रूग्णालय 10, डॉ. पवार रूग्णालय 17 रूग्णांचा समाावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या