नाशिक जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली

दिवसभरात १ हजार ६१ रूग्णांची करोनावर मात
नाशिक जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात मागील चोवीस तासात 712 रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर त्यापेक्षा साडेतीनशेने अधिक 1 हजार 61 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा वाढत असून तो 75 हजार 173 वर पोहचला आहे. मागील आठ दिवसात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तसेच नव्याने दाखल होणारांचेही प्रमाण घटत आहे...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 712 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 530 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 56 हजार 884 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 155 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 23 हजार 638 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 16 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 3 हजार 960 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 600 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 1 हजार 61 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 75 हजार 173 वर पोहचला आहे.

करोनामुळे आज 15 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 13 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 498 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला आहे. सरासारी दोन ते अडीच हजार नवे संशयित दाखल होत होते. तो आकडा हजारच्या जवळ आला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण करोना बाधित : 85,082

नाशिक : 56,884

मालेगाव : 3,960

उर्वरित जिल्हा : 23,638

जिल्हा बाह्य : 600

एकूण मृत्यू: 1,513

करोनामुक्त : 75,173

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com