करोनाबाधित असल्याच्या संशयावरून मारहाण; गुन्हा दाखल

करोना बाधित
करोना बाधित

नवीन नाशिक | प्रतिनिधी

करोनाबाधित असल्याच्या संशयावरून शेजाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा प्रताप चौक येथील, महाले फार्म येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस त्याच्याच शेजारी राहणाऱ्या, आप्पा मोतीराम बच्छाव यांच्यासह त्यांची दोन मुले निशांत व प्रशांत पत्नी तसेच दोन्ही सूनांनी तुम्ही करोना पॉझिटिव्ह आहात, तुम्ही इथे कसे राहतात असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच त्यांचा मुलगा निशांत याने हातातील फरशीचा तुकडा या व्यक्तीच्या डोळ्यावर मारत दुखापत केली.

या व्यक्तीचा मुलगा वाद सोडविण्यास आला असता त्याला देखील मारहाण केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संजय बेडवाल करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com