गेल्या आठवड्यात नाशकात ३५ मृत्यू अन् तब्बल ५ हजार नवे रुग्ण

गेल्या आठवड्यात नाशकात ३५ मृत्यू अन् तब्बल ५ हजार नवे रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शासनाकडुन गेल्या दोन महिन्यापुर्वी करोना रुग्ण वाढीचा जाहीर झालेला अंदाज खोटा ठरत असुन दीड दोन पटीने रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या जुलै महिन्यात करोना रुग्णांचा आकडा...

9 हजाराच्या वर गेल्यानंतर ऑगस्ट महिन्यात आकडा दुप्पटीच्या वर गेला आहे. सप्टेंबरच्या 6 दिवसात 4 हजार 802 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

बाधीतांच्या वाढत्या आकड्याबरोबर मृतांचा आकडा जुलैच्या तुलनेत दुप्पट न झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला असुन आता महापालिका प्रशासन मृत्यु दर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

नाशिक शहरातील करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असुन ऑगस्ट महिन्यात प्रतिदिन साधारण 500 च्या आसपास रुग्ण वाढले होते. आता मात्र सप्टेंबर महिन्यात गेल्या सहा दिवसात प्रतिदिन 700 - 750 इतके नवीन करोना रुग्ण दाखल होऊ लागले आहे.

आजमितीस सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचा आकडा साडेचार - सव्वा चार हजाराच्या दरम्यान जाऊन पोहचला आहे. मात्र शहरात बाधीतांचा आकडा वाढत असला तरी आता मृतांची संख्या घटू लागली आहे.

तरीही शासनाने वाढते रुग्ण कमी करण्यासाठी गंभीर दखल घेतली असुन तातडीच्या उपाय योजना सुरू झाल्या आहे.

यादृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णालयातील सोयी सुविधांची पाहणी सुरु करीत रुग्णालयात अतिरीक्त साधणे मशिनरी यांची पुर्तता करण्याचे काम सुरू केले आहे.

शहरात 6 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर गेल्या पाच महिन्यात करोना रुग्णांचा आकडा 30 हजारावर गेला असुन यापैकी 25 हजारावर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

तर आत्तापर्यत 526 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला असुन यात सर्वाधिक 60 वर्षावरील वृद्धांचा समावेश आहे.

शहरातील करोना रुग्ण व मृतांची स्थिती

महिना रुग्ण मृतांची संख्या प्रत्यक्ष मृत्यु

एप्रिल 2020 10 00 00

मे 2020 214 08 08

जुन 2020 2182 105 97

जुलै 2020 9441 276 171

ऑगस्ट 2020 25451 491 215

6 सप्टेंबर 2020 30253 526 35

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com