Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात करोनाचा आकडा 31 हजार पार; 24 तासांत वाढले इतके...

नाशिक जिल्ह्यात करोनाचा आकडा 31 हजार पार; 24 तासांत वाढले इतके रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरत तसेच जिल्हात करोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असताना आज पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत रूग्ण बरे होण्याच्या तुलनेत घट नोंदवली गेली. यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

गेली 24 तासात जिल्ह्यात 620 रूग्णांची नोंद झाली. यामुळे आतापर्यंतचा करोना पॉझिटिव्हचा आकडा 31 हजार 58 इतका झाला आहे. तर आज दिवसभरात 643 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 620 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 470 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 20 हजार 818 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 148 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 7 हजार 728 झाला आहे. मालेगावत पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. दिवसभरात 2 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

यामुळे मालेगावचा आकडा 2 हजार 306 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 206 झाला आहे. तर 24 तासात जिल्ह्यातील 643 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 25 हजार 341 वर पोहचला आहे.

करोनामुळे दिवसभरात 14 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 नाशिक शहरातील असून यामध्ये एका पोलीस सेवकाचा सामावेश आहे. ग्रामिण भागातील 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 799 वर पोहचला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत आहे. 24 तासात 877 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 566, ग्रामिण व गृह विलगीकरण 261, मालेगाव 31, जिल्हा रूग्णालय 7, डॉ. पवार रूग्णालय 12 रूग्णांचा समाावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित: 31,058

* नाशिक : 20,818

* मालेगाव : 2,306

* उर्वरित जिल्हा : 7,728

* जिल्हा बाह्य ः 206

* एकूण मृत्यू: 799

* करोनामुक्त : 25,341

- Advertisment -

ताज्या बातम्या