Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात करोना रुग्ण संख्या वाढली, मृत्यू दर मात्र घटला

नाशकात करोना रुग्ण संख्या वाढली, मृत्यू दर मात्र घटला

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना संसर्ग वाढत लक्षात घेऊन अ‍ॅन्टीजेन चाचणी, करोना चाचणी वाढविल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे शहरात रुग्ण वाढत असले तरी आता रुग्णांच्या तुलनेत मृत्यु दर घटला आहे.

- Advertisement -

आता रुग्ण वाढत असल्याने मृत्यु दर 1.67 टक्क्यावर आला आहे. नाशिक शहरातील करोनाचा संसर्गाचे प्रमाणात वाढत असुन आता दररोज सरासरी 700 ते 800 अशा नवीन रुग्णांची भर पडत असुन परिणामी शहरातील आत्तापर्यत करोना बाधीतांचा आकडा 37 हजारावर गेला आहे.

तसेच एकुण मृत्युचा आकडा 599 पर्यत पोहचला आहे. सप्टेंबरच्या 14 दिवसात शहरात 108 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. मागील ऑगस्ट महिन्यात 215 जणांचा बळी गेला होता.

आता दिवसाला सरासरी 7 ते 8 जणांना मृत्यु होत आहे. असे असले तरी रुग्णांची संख्या वाढत असल्याने मृत्युचा दर कमी होऊ लागला आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात केवळ 10 रुग्ण असतानां एकही मृत्यु झालेला नव्हता. त्यानंतर मे महिन्यात करोना संक्रमण वाढत गेल्यानंतर या महिन्यात 214 रुग्ण होऊन 8 जणांना मृत्यु झाला होता. नंतर जुन महिन्यात रुग्ण संख्या अडीच हजाराच्या घरात असल्याने मृत्यु दर 4.81 टक्क्यापर्यत गेला होता.

जुलै महिन्यात करोना संसर्ग लक्षणीय वाढत जाऊन रुग्णांचा आकडा 9 हजारावर गेला होता. तर मृतांत 119 इतकी भर पडली होती. या महिन्यात मृत्यु दर 2.92 टक्के झाला होता. आता ऑगस्ट महिन्याच्या सोळा दिवसात रुग्णांचा आकडा सोळा हजारावर गेल्यामुळे आता मृत्यु दर आणखी घटला होता.

आता सप्टेंबर महिन्यात देखील रुग्णांचा आकडा वाढता असल्याने मृत्युचे प्रमाणात 1.77 वरुन 1.67 टक्के इतके झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या