Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअबब...नाशिक शहरात प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या पाहून तुम्हीही आवाक व्हाल

अबब…नाशिक शहरात प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या पाहून तुम्हीही आवाक व्हाल

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या चार महिन्यात करोनाचा मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले असुन आत्तापर्यत करोना बाधीतांचा आकडा बारा हजारावर गेला असुन साडेआठ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

- Advertisement -

असे असले तरी प्रतिबंधीत क्षेत्र निर्माण होऊन करोना फटका शहरातील सुमारे 2 लाख लोकांना बसला आहे. शहरात आजमितीस इमारती व परिसर असे 635 प्रतिबंधीत क्षेत्रात महापालिकेकडुन आरोग्य तपासणीचे काम सुरू आहे.

नाशिक शहरात पहिला करोना रुग्ण 6 एप्रिल रोजी सापडला होता. यावेळी मुंबईनाका भागात असलेल्या गोविंदनगर भागातील रुग्णांच्या घरापासुन जवळपास एक कि. मी. अंतराचा चारही बाजुंचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केले आहे होते.

चौदा दिवस हा परिसर पुर्णत: बंद करण्यात आला होता. आज 6 ऑगस्ट रोजी शहरात 635 प्रतिबंधीत क्षेत्र कार्यरत असुन या सर्व इमारती व परिसरात महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे आरोग्य तपासणी व मिशन झिरो अंतर्गत फिरत्या वाहनांचे दवाखान्यांकडुन आरोग्य तपासणी व अँटीजेन चाचण्या केल्या जात आहे.

तसेच महापालिका शिक्षण मंडळाचे साडेसहाशे शिक्षकांकडुन विविध आजाराने ग्रस्त असलेल्या वृध्दांची माहिती संकलन व काळजी घेण्यासंदर्भातील माहिती दिली जात आहे.

गेल्या चार महिन्यात महापालिका क्षेत्रात एकुण 1 हजार 784 प्रतिबंधीत क्षेत्र आयुक्तांकडुन जाहीर करण्यात आले होते. 6 एप्रिलपासुन सुरू झालेली करोना विरुध्दची लढाई अजुन सुरुच असुन टप्प्या टप्प्याने ज्या प्रतिबंधीत क्षेत्रात चौदा दिवसात नवीन रुग्ण आढळला नाही, अशा प्रतिबंधीत क्षेत्रावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले.

मात्र पुढच्या काळात करोना बाधीतांचा आकडा वाढत गेल्यानंतर परिसरात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर न करता रुग्ण राहत असलेल्या इमारती पुरते प्रतिबंधीत क्षेत्र ठेवण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांचा त्रास कमी झाला असला तरी रुग्णांची संख्या वाढत आहे. याच प्रतिबंधीत क्षेत्रावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या