Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याघोरवड घाटात बर्निंग कारचा थरार; चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

घोरवड घाटात बर्निंग कारचा थरार; चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

सिन्नर । Sinnar

सिन्नर-घोटी महामार्गावर (Ghoti Sinnar highway) घोरवड घाटात (Ghorwad Ghat) आज (दि. 16) पहाटे 4.15 दरम्यान बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. या दुर्घटनेत कारचालकाचा वाहनातच जळून मृत्यू झाला…

- Advertisement -

विठ्ठल कृष्णा कोकाटे (24) रा. अहमदनगर, ह. मु. पनवेल यांची ट्रॅव्हल्स कार क्र. एम. एच. 46 बी. बी. 6261 असून ते मुंबईहून भाडे घेऊन शिर्डी येथे आले होते. शिर्डीला भाडे सोडवून ते मंगळवारी (दि. 15) रात्री मुंबईला निघाले होते. पहाटेच्या सुमारास घोरवड घाटात आले असता कारमधील गॅसच्या टाकीने अचानक पेट घेतला.

बघता-बघता पुर्ण कारने पेट घेतल्याने चारही दरवाजे आतून लॉक झाले होते. त्यांना कारबाहेर पडता आले नाही. रात्रीच्या वेळी महामार्गावर मदतीसाठीही कुणी नसल्याने ते कारमध्येच अडकून पडले. मोठ्या प्रमाणावर आगीचा भडका उडाल्यामुळे कारमध्येच त्यांचा मृतदेह जळून राख झाला. कारही पुर्णपणे जळून खाक झाली आहे.

बऱ्याच वेळानंतर महामार्गाने जाणाऱ्या काही वाहनधारकांनी सिन्नर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. यानंतर एएसआय गणेश परदेशी व पोलिस नाईक नवनाथ शिरोळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. जळालेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नगरपालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या