नाशकात पुन्हा विनापरवानगी बैलगाडा शर्यत; आयोजकांवर गंभीर गुन्हे

दिंडोरी तालुक्यातील प्रकार; आठ जणांवर गुन्हे
नाशकात पुन्हा विनापरवानगी बैलगाडा शर्यत; आयोजकांवर गंभीर गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) परवानगीनंतर नाशिकमधील ओझरमध्ये (Ojhar) झालेली बैलगाडा शर्यत वादात सापडली होती. या शर्यतीतील आयोजकांवर गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात आलेली असतानाच पुन्हा दिंडोरी तालुक्यातीलच लखमापूर (Lakhmapur Tal Dindori) येथेही यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे (Bullock cart race) आयोजन करत ८०० ते १०० नागरिकांना जमविल्याप्रकरणी आठ ते दहा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

नाशकात पुन्हा विनापरवानगी बैलगाडा शर्यत; आयोजकांवर गंभीर गुन्हे
बैलगाडा शर्यत अंगलट; शिवसेनेच्या माजी आमदाराला कोणत्याही क्षणी अटक

रवींद्र पवार, विजय देशमुख, शिवनाथ पवार, अजिंक्य सोनवणे, गोरख सोनवणे, प्रवीण सोनवणे, खंडेराव शार्दुल, शामराव देशमुख यांच्यासह इतर आयोजकांवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशकात पुन्हा विनापरवानगी बैलगाडा शर्यत; आयोजकांवर गंभीर गुन्हे
महाराष्ट्रात धुरळा उडणार! बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी

अधिक माहिती अशी की, रविवारी (दि २६) रोजी दुपारी साडेतीन ते पाच वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे यात्रेच्या निमित्ताने विनापरवानगी बैल आणि घोडा यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर स्थानिक जिल्हा प्रशासनाची परवानगी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी घेणे अनिवार्य आहे.

यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून या परवानगी दिल्या जातात. मात्र, असे काहीही न करता सर्रासपणे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली.

यामुळे सध्या लागू करण्यात आलेल्या करोना नियमांचे उल्लंघन आणि प्राणीमात्रांचा छळ यानुसार कडक कारवाई शर्यतीच्या आयोजकांवर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.