नाशिकवर शोककळा; बीएसएफ जवानाला वीरमरण

नाशिकवर शोककळा; बीएसएफ जवानाला वीरमरण

पालखेड मिरचीचे | वार्ताहर Palkhed Mirchiche

निफाड तालुक्यातील ( Niphad Taluka ) नांदुर्डी गावातील ( Nanduradi ) किशोर गंगाराम शिंदे वय( ३३) ( Kishor Gangaram Shinde ) हा तरुण अमृतसर येथे बीएसएफ ( BSF )अर्थात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना मंगळवारी दिनांक १२/४/२०२२ रोजी या वीर जवानाला अपघाती वीर मरण आल्याने नादुंर्डी गावावर शोककळा पसरली आहे तर शिंदे कुंटूबावर या अचानक आलेल्या प्रसंंगाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नी काजल व दीड वर्षाची मुलगी वेदिका सह‌ अमृतसर येथील बीएसएफ च्या कॅम्पमध्ये राहत होता किशोरच्या जाण्याने रासाका येथे कार्यरत असणारे साखर कामगार वडील गंधाधर केदु शिंदे आई अनुसया गंगाधर शिंदे, लहान भाऊ संकेत गंगाधर शिंदे असा परिवार आहे घरात मोठा असल्याने घरातील कर्ता पुरूष गेल्याने शिंदे कुटूंबाचा आधारवड गेला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किशोर शिंदे यांचा अंत्यसंस्कार नांदुर्डी येथे करण्यात येणार आहे प्रशासकीय यंत्रणेकडुन अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने अंत्यविधीची अधिकृत वेळ निश्चित करण्यात आली नाही.

शहीद किशोर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याने कार्हाबाई नदीतीरी असणाऱ्या मोकळ्या पटांगणात चबुतरा व मंडप टाकण्याचे काम नांदुर्डी ग्रामपालिका, नांदुर्डी तलाठी कार्यालय, रानवड मंडल अधिकारी, नांदुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व किशोर शिंदे यांचे शालेय मित्र हे जातीने लक्ष ठेवून सदर अंतिम संस्कार सोहळ्याची तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com