...म्हणून भाजप सत्तेतून पायउतार; चंद्रकांत पाटलांनी उकलले गूढ

...म्हणून भाजप सत्तेतून पायउतार; चंद्रकांत पाटलांनी उकलले गूढ

सातपूर | प्रतिनिधी Satpur

भाजपने पाचवर्ष उत्तम प्रकारे सरकार चालवत राज्याच्या विकासाला गती आणली होती. मात्र, ‘विश्वास घात’ झाल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर मात्र विकास खूंटल्याचं चित्र आहे. महिलांवरील अत्याचार ड्रग्जचा वारेमाप वापर, एक चतुर्थांश मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या जाळ्यात असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे शाळेच्या उद्घाटन प्रसंगी लगावला.

श्रमिकनगर येथे आयोजित छ. शिवाजी महाराज विद्यालयाच्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपिठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, माजी मंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आ.सीमा हिरे आ.राहुल ढिकले, आ.डॉ.राहुल आहेर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी,प्रशांत जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गीते, उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी महापौर रंजना भानसी, माजी महापौर बाळासाहेब सानप, माजी शहराध्यक्ष विजय साने, नगरसेविका डॉ.वर्षा भालेराव, इंदुबाई नागरे, माधूरी बोलकर, प्रतिभा पवार,नगरसेवक रवींद्र धिवरे आदींसह मान्यवर होते.

मुस्लिम मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधताना सरकार सत्तेचे राजकारण करीत आहे. जातीयवादी मतांच्या भावनेतून गुन्हेगारांना कुरवाळत आहे.आज शिवसेनाप्रमुख असते, तर त्यांनी थोबाडीत लगावली असती अशा आशयाची कोपरखळी मारली.त्याचवेली शाळेबद्दल गौरवोद्गार काढताना नगरसेवकांद्वारे उत्तम शाळा मोठा कार्यक्रम विकासकामांचा धडाका या माध्यमातून येणार्‍या काळात मनपा जिंकणे निश्चितअसल्याचे सांगितले.

आजचा कार्यक्रम नगरसेवकांचा वाटत नसून, खासदारांनी बोलावलेली सभा वाटावी असा असल्याचे नमूद केले. पाच वेळा खासदार होऊन तीन वेळा मंत्री राहण्याचे भाग्य लाभले. शेतकरी बांधवांना मध्ये विश्वास निर्माण झालेला असल्याचे सांगून 2014 नंतर शेतकरी विमा भरू लागल्याचे हे प्रतीक आहे.

- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

अनेक क्षेत्रांद्वारे कामे होत आहेत. मात्र, शिक्षण क्षेत्रात ज्यांनी काम केले. त्यांनी समाजिक कार्याचे प्रभावी अस्त्र ओळखले आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वात देशात आरोग्य क्षेत्रामध्ये मोठे काम उभे राहत आहे. ‘हर घर दस्तक-व्हॅक्सिनेशन’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला लसीकरण करणे हाती घेण्यात आले आहे. 15 नोव्हेंबरला ‘जनजाती गौरव दिन’ साजरा करण्यात यावा असेही त्यांनी आवाहन केले.

- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

केवळ पिढी सुशिक्षित करून भागणार नाही तर त्यांना सुसंस्कृत करणे गरजेचे आहे. मोबाईलच्या युगामध्ये शिक्षण त्रोटक झाले आहे. मुलांना इतिहास पूर्ण ज्ञात होत नाही. भविष्यात ही नवी पिढी देशाचा इतिहास विसरून जाईल. यासाठी त्यांच्यावर खर्‍याअर्थाने संस्कार होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

माजी मंत्री गिरीश महाजन

प्रास्ताविकात दिनकर पाटील यांनी चार एकर च्या भूखंडावर सुसज्य शाळा भरली आहे. 31 प्रभागांमध्ये 90 शाळा द्वारे 24 ते 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर शिवाजीनगरच्या एकाच शाळेमध्ये 2082 मुले पहिली ते दहावीचे शिक्षण घेत आहेत. ही गौरवाची बाब असल्याचे सांगितले.

जनता सुज्ञ झाली आहे. जनता ठेकेदारी, गुंडागर्दी, ब्लॅकमेलींग करणार्‍यांना साथ देणार नाही. परिसरात दोन डोंगर आहेत एक फाशीचा डोंगर तर एक उंदरा-मांजराचा डोंगर म्हणून ओळखला जातो त्यामुळे प्रभागात फिरणार्‍या बागड बिल्यांचं प्रमाण वाढलं असल्याची विरोधकांवर टीका केली.

शेवटी आभार गिरिष पालवे यांनी मानले.मिलींद शिंदे याचंया भावगिताद्वारे पाहण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संदिप तांबे, अ‍ॅड. महेंद्र शिंदे, साहेबराव दातीर व दिपक आरोटे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com