सरकार हमसे डरती है! पुलिस को आगे करती है!
मुख्य बातम्या

सरकार हमसे डरती है! पुलिस को आगे करती है!

दुध अनुदान देण्याच्या मागणीसाठी भाजपचा 'रास्तारोको'

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकार हमसे डरती है! पुलिस को आगे करती है! अशा घोषणा देत आज नाशिकमध्ये भाजपने दुध आंदोलन करत रस्ता रोको केला. आजच्या रास्ता रोकोमुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा, प्रतिलीटर १० रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी भाजपने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपच्या वतीने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दहावा मैल येथे रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनात भाजपसाहित मित्रपक्षांनीही सहभाग घेतला असून महाविकास आघाडीच्या विरोध घोषणा देण्यात आल्या.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशासाठी भाजप आग्रही असून यापूर्वी सरकारला इशारा देण्यात आला होता. मात्र, दूध उत्पादकांची निराशा करण्याचे काम शासनाने केले असून अजूनही सरकारने भानावर यावे अशी अपेक्षा या आंदोलनात व्यक्त करण्यात आली.

भाजप आमदार देवयानी फरांदे,राहुल ढिकले, खासदार भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती.

आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 58 आंदोलक,शेतकरी यांना अटक करण्यात आली आहे.

प्रारंभी सैय्यद पिंप्री येथे दुध संकलन केंद्रवर सकाळी भाजपने आंदोलन केले. ग्रामीण भागातील आजूबाजूच्या खेड्यावरून शेतकऱ्यांनी आणलेले दूध संकलन केंद्रावर न देता तेच दूध शेतकऱ्यांना गरम करून पिण्यासाठी वाटण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com