Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआसाराम बापू आश्रमाच्या संचालकावर गंभीर गुन्हा; गुजरात पोलिसांची नाशकात मोठी कारवाई

आसाराम बापू आश्रमाच्या संचालकावर गंभीर गुन्हा; गुजरात पोलिसांची नाशकात मोठी कारवाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या १२ वर्षांपासून फरार म्हणून घोषित असलेल्या गुन्हेगारास गुजरात पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. संशयित हा नाशिकमधील आसाराम बापू आश्रमाचा संचालक आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १२ वर्षांपूर्वी संजय किशनकिशोर वैद याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा गुजरातमध्ये दाखल होता. या गुन्हयात वैद हा फरार संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे….

- Advertisement -

वैद हा नाशकात आसाराम बापू आश्रमात संचालक म्हणून कार्यरत आहे. काल (दि ०२) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आश्रमातील गायींना खाद्य खरेदी करण्यासाठी आश्रमाचे वाहन क्रमांक एमएक ४८ टी ३०९६ गाडी घेऊन नागसेठीया पशु खाद्य दुकान सेवाकुंद पंचवटी इथे आला होता. यादरम्यान गुजरातच्या चार पोलिसांनी त्यास ताब्यात घेत गुजरातला नेले आहे.

दरम्यान, याबाबत राजेश चंद्रकुमार डावर यांनी वैद यांच्या अपहरणाची तक्रार दिली असून पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर हे अपहरण नसून गुजरात पोलिसांनी नाशिकच्या पोलिसांना याबाबत कुठलीही माहिती न देता केलेली कारवाई असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या