Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक शहरासाठी तब्बल इतक्या 'अँटीजेन किट'ची मागणी

नाशिक शहरासाठी तब्बल इतक्या ‘अँटीजेन किट’ची मागणी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात करोनाचा संक्रमण रोकण्यासाठी महत्वाची भुमिका पार पाडत असलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्ट किटची संख्या कमी झाल्यानंतर आरोग्य विभागाकडुन पुन्हा….

- Advertisement -

50 हजार किट मागणी करण्यात आली. दरम्यान बुधवारी 5 हजार किट मिळाल्या असुन शहरात अँटीजेन चाचण्या सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली.

शहरात गेल्या काही दिवसात करोना बाधीत ंगंभर रुग्णांना दिला जाणार द्रवरूप प्राणवायूचा तूटवडा भेडसावत आहे. यासंदर्भात जिल्हा व महापालिका प्रशासनाकडुन उपाय योजना केल्या जात आहे.

ऑक्सिजन कंपन्यांना पुरवठा दुप्पट करण्यास सांगण्यात आले आहे. असे असतांनाच महापालिकेला मिळालेल्या अँटीजेन टेस्ट किट संपण्याच्या मार्गावर असल्यासंदर्भातील माहिती समोर आली होती.

शहरात मिशन झिरो अंतर्गत असलेल्या मोहीमेला रॅपिड टेस्ट किट कमी देण्यात आल्याने ही बाब समोर आली होती. तसेच महापालिका, भारतीय जैन संघटना आणि अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुरू असलेल्या मिशन झिरो अंतर्गत 44 दिवसांत जवळपास 60 हजार प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या.

पालिकेच्या रुग्णालयात सुमारे 20 हजार चाचण्या झाल्या. संचांची उपलब्धता न झाल्यामुळे सलग 44 दिवस वेगवेगळ्या भागात सुरू असणारी मोहीम बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस बंद करण्याची वेळ आली होती. मात्र आरोग्य विभागाकडुन अँटीजेन चाचण्या थांबविण्यात आलेल्या नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिकेकडुन 93 हजार अँटीजेन टेस्ट किटची खरेदी केली होती. तसेच जिल्हा प्रशासनाने साडेचार हजार संच दिले होते. अशाप्रकारे 1 लाख संचातून 17 हजार 500 किट जळगाव महापालिकेला देण्यात आले होते.

त्यांना तुटवडा निर्माण झाल्याने परतीच्या बोलीवर जळगांव हे किट दिले गेले आहे. आजपर्यत महापालिकेने जवळपासुन 83 हजार अ‍ॅन्टीजेन चाचण्या केल्या आहे. यात सुमारे 12 हजार रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आता महापालिका प्रशासनाकडुन पुन्हा 50 हजार किटची मागणी नोंदविली असुन यातील 5 हजार किट महापालिकेला प्राप्त झाले आहे.

पथकातील 12 जण करोना पॉझिटीव्ह

महापालिका, भारतीय जैन संघटना आणि अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने महापालिकेच्यावतीने शहरात राबविली जात असलेल्या मिशन झिरो या तपासणी मोहीमेत काम करणार्‍या पथकातील 12 जणांना करोनाची बाधी झाली आहे. यामुळे या मोहीमेला फटका बसला असुन तरीही दुसर्‍या कर्मचार्‍यांमार्फत ही मोहीम सुरू असल्याचे महापालिकेकडुन सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या