Thursday, April 25, 2024
Homeनाशिक९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घाेषणा उद्या; स्थळनिवड समितीकडून पाहणी

९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घाेषणा उद्या; स्थळनिवड समितीकडून पाहणी

नाशिक | प्रतिनिधी

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयाेजन नाशिकमध्येच केले जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. संमेलनासाठी गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या मैदानाची पाहणी गुरूवारी नाशकात दाखल झालेल्या साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली…

- Advertisement -

प्रस्तावित साहित्य संमेलन आयोजनाच्या दृष्टिकोनातून येथील विविध मैदानांची आणि परिसराची पाहणी देखिल करण्यात आली.भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने नाशिकमध्ये दाखल झालेल्या स्थळ निवड समिती पथकामध्ये महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा समावेश आहे.

या समितीने गुरुवारी सकाळपासून नाशिकमधील प्रस्तावित साहित्य संमेलन आयोजनाच्या दृष्टिकोनातून शहरातील विविध मैदानांची आणि परिसराची पाहणी केली. लोकहितवादी मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, किरण समेळ, शंकर बोराडे संजय करंजकर, आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीच्या दौऱ्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर उद्या दि. ८ जानेवारीला संमेलनाच्या स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आैरंगाबाद मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली हाेती.

साहित्य संमेलनासाठी पुणे, अंमळनेर, नाशिक, सेलू येथील संस्थेची निमंत्रणे आली. होती. नाशिक येथील दोन संस्थांनी निमंत्रणाचे प्रस्ताव पाठवले होते. त्यात सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि लोकहितवादी मंडळ यांचे प्रस्ताव होते. या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा होऊन साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची निवड करण्यात आली.

या समितीत अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते आणि प्रकाश पायगुडे यांचा समावेश आहे. या समितीने नाशिक येथे स्थळ निवडीसाठी भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या