Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंभाजी ब्रिगेडकडून व्यंकय्या नायडूंचे पोस्टर जाळून निषेध

संभाजी ब्रिगेडकडून व्यंकय्या नायडूंचे पोस्टर जाळून निषेध

नायडूंच्या वक्तव्यावर काय म्हणाले, उदयनराजे

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

राज्यसभा खासदारकीची शपथ घेताना उदयनराजे भोसले यांनी केलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवल्यांच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर आंदोलन केले. नायडू यांचे पोस्टर जाळत भाजप व संघ परिवाराविरुध्द जोरदार घोषणाबाजी केली.

शपथविधी दरम्यान सभापती नायडू यांनी हे माझे चेंबर असून असा जयघोष चालणार नाही असे उदयनराजे यांना समज दिली होती.

या विरुध्द महाराष्ट्रात वातावरण तापले असून विविध संघटना रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध नोंदवत आहे. संभाजी ब्रिगेडने गुरुवारी ( दि.२३) भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला.

भाजपला जय श्रीराम चालते पण शिवाजी महाराज नको. दिल्लीतील व राज्यातील मागील फडणवीस सरकार ‘शिव छत्रपती का आशीर्वाद’ अशी घोषणा देऊन सत्तेत आले. भाजपने फक्त निवडणुकीपुरता शिवरायांचा वापर केला.

भाजप व आरएसएस निगडित संघटनाचा पहिल्यापासून शिवाजी महाराज या नावाला विरोध आहे. उदयन राजेंनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी या घोषणेचा विरोध हा छत्रपतींचा व महाराष्ट्राचा अपमान आहे असा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला.

नायडू यांचे फोटो असलेले पोस्टर जाळून जोरदार निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी,निवास मोरे, शशिकांत कतारे,निलेश कुसमोदे,बापू आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या