Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांचा आकडा ४४ हजार ८३९ वर; २४ तासांत २०...

नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांचा आकडा ४४ हजार ८३९ वर; २४ तासांत २० रुग्ण दगावले

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरत तसेच जिल्हात करोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. गेली 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 149 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत….

- Advertisement -

यामुळे आतापर्यंतचा करोना पॉझिटिव्हचा आकडा 44 हजार 839 इतका झाला आहे. तर आज दिवसभरात 20 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 1 हजार 149 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 734 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 30 हजार 787 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 343 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 10 हजार 905 झाला आहे. मालेगावत पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. दिवसभरात 72 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

यामुळे मालेगावचा आकडा 2 हजार 903 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 244 झाला आहे. तर 24 तासात जिल्ह्यातील 1 हजार 86 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 36 हजार 152 वर पोहचला आहे.

करोनामुळे दिवसभरात 20 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक 12 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 7 व मालेगाव येथील 1 रुग्णाचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 953 वर पोहचला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत आहे. 24 तासात 1 हजार 517 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 1 हजार 217, ग्रामिण व गृह विलगीकरण 279, मालेगाव 46, जिल्हा रूग्णालय 6, डॉ. पवार रूग्णालय 22 रूग्णांचा समाावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण कोरोना बाधित : 44ें,839

नाशिक : 30,787

मालेगाव : 2,903

उर्वरित जिल्हा : 10,905

जिल्हा बाह्य ः 244

एकूण मृत्यू: 953

करोनामुक्त : 36,152

- Advertisment -

ताज्या बातम्या