Saturday, April 27, 2024
Homeनाशिकवर्षभरात ४४ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

वर्षभरात ४४ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

नाशिक । प्रतिनिधी

गत वर्षात जिल्हयात आस्मानी व सुल्तानी संकटामुळे ४४शेतकर्‍यांनी अात्महत्या करत जीवन संपविले आहे. त्यापैकी २२ पैकी जवळपास १३ पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच आत्महत्या केल्या आहे.निफाडमध्ये सर्वाधिक १३ जणांनी आपले जीवन संपविले…

- Advertisement -

२०१९ मध्ये १०८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत गतवर्षी आत्महत्येचा आकडा कमी असला तरी आत्महत्या थांबविण्यास अपयश आले आहे. कर्जबाजारीपणा, त्यात पिकाला योग्य भाव न मिळणे, त्यावर अतिवृष्टी, गारपीट हे संकटाचे चक्र सुरुच आहे. त्यातच करोनाचे भीषण संकटाने शेतकर्‍यांचे अतोनात नूकसान केले.

पिकांना बाजारपेठाही उपलब्ध होण्यास अडचणी वाढल्या. यातून डोक्यावर असलेले बँक, सावकरा, पतसंस्था अन् सोसायट्यांचे कर्ज कसे भरायचे या चिंतेने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ४४ शेतकऱ्यांनी आपले जीनव संपविण्याचाच मार्ग अवलंबला आहे.

४४ आत्महत्यांपैकी २२ शेतकऱ्यांवर कर्जाच्या बोजा असल्याचे त्यांच्या तपासणी अहवालात उघड झाल्याने त्यांचे प्रकऱण शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना एक लाखाची शासकीय मदत वितरीत करण्यात आली आहे. ११ शेतकऱ्यांची प्रकरणे वैयक्तिक, कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे दिसून आल्याने नामंजूर केली असून, ११ प्रकरणांवर निर्णय घेणे अद्याप बाकी आहे.

तालुका निहाय आत्महत्या

नाशिक -३, बागलाण-८, चांदवड-१, सिन्नर -३, दिंडोरी -६, कळवण-३,मालेगाव-१, नांदगाव -१, त्र्यंबकेश्वर -३, निफाड -१३,येवला-१, पेठ-१

- Advertisment -

ताज्या बातम्या