Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक शहरात २११ करोना रुग्णांवर घरीच उपचार सुरू

नाशिक शहरात २११ करोना रुग्णांवर घरीच उपचार सुरू

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असुन शहरातील महापालिका, जिल्हा रुग्णालयांसह सर्व खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहे.

- Advertisement -

करोना पॉझिटीव्ह आलेले परंतु त्यांच्यात फारसे लक्षणे दिसत नाही अशा रुग्णांकडुन सहमती फॉर्म भरुन घेऊन त्यांच्यावर त्यांच्या घरात उपचार सुरू करण्यात आले आहे.

अशाप्रकारे महापालिका क्षेत्रातील बाधीत 211 रुग्णांवर घरीच उपचार सुरू करण्यात आले असुन त्यांच्या घरी जाऊन महापालिका पथकांकडुन त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात रुग्ण वाढीचे नव नवीन उच्चांक केले जात आहे. शहरात 1 जुलै रोजी 230, नंतर 15 जुलैला 234 आणि 17 जुलै रोजी 403 अशाप्रकारे नवीन रुग्ण वाढीचा उच्चांक होऊ लागला आहे.

याचबरोबर ज्या दिवशी नवीन रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे, त्याच दिवशी संशयितांचा आकडा वाढत आहे. गेल्या दोन दिवसात नवीन रुग्णांच्या संपर्कातील संशयितांचा आकडा तीन हजारापर्यत जाऊन पोहचला आहे.

दररोज वाढत असलेल्या रुग्णांमुळे महापालिका प्रशासनाकडुन करोना पॉझिटीव्ह आढळून आलेले, मात्र त्यांच्यात फारसे लक्षणे दिसत नाही, अशा व्यक्तींना त्यांचा सहमती फॉर्म भरुन घेऊन त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहे.

अशाप्रकारे शहरात आजमितीस 211 रुग्णांवर उपचार केले जात आहे. या रुग्ण व नातेवाईकांशी चर्चा करुन त्याचा संमती फॉर्म भरुन घेऊन त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहे.

करोना पॉझिटीव्ह रुग्णांची फारशी लक्षणे दिसत नसल्याने त्यांच्याकडुन घरीच उपचार घेण्यासाठी एक फॉर्म भरुन घेतला जातो. त्यात त्यांना महापालिकेच्या वैद्यकिय अधिकार्‍यांचे मोबाईल नंबर दिले जातात. रुग्णांसाठी दररोज पल्स ऑक्सीलेटर व तापमापी द्वारे त्यांना शरिरातील आक्सीजनचे प्रमाण व ताप तपासण्यास सागंण्यात येते. त्यांना औषधाच्या गोळ्या दिल्या जातात. त्यांना जास्त त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे काम महापालिका वैद्यकिय विभागाकडुन तात्काळ केले जाते. तसेच घरी उपचार घेत असलेल्ंया रुग्णांची दररोज महपाालिकेच्या पथकाकडुन तपासणी केली जो, अशी माहिती महपालिका वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या