भुजबळ का म्हणाले? माझ्या घरासमोरुन बस गेली पाहिजे...

भुजबळ का म्हणाले?  माझ्या घरासमोरुन बस गेली पाहिजे...
छगन भुजबळ

नाशिक (nashik)

नाशिकच्या सीएनजी बसेसचा (CNG bus )लोकार्पण सोहळा आज झाला. महाकवी कालिदास कलामंदिर या दालनात झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात दालनाबाहेर उभ्या असलेल्या बसेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आली.

छगन भुजबळ
एकाच तिकीटावर सीएनजी बस आणि निओ मेट्रोचा प्रवास व्हावा - देवेंद्र फडणवीस

शहर बससेवा लोकार्पण सोहळानिमित्त पावसाळी अधिवेशात झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि पालकमंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal) एकाच व्यासपीठावर आले. यावेळी गिरीश महाजन (girish mahajan), जयकुमार रावळही (jaykumar rawal) उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal) म्हणाले, की बुधवारी नाशिकच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात हसू होते. एका आर्थाने नाशिकचे सुपत्र असलेले दिलीप कुमार यांचे निधन झाले. तर हसू म्हणजे आपल्या जिल्ह्यास व येवल्यास केंद्रात भारती पवार यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाले. त्यांना आरोग्य खाते मिळाले. यामुळे आता नाशिकला कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यावर मात करणे सोपे होईल. कारण केंद्रात आमच्या मंत्री आहेत आणि केंद्रात त्यांच्यांकडे आरोग्य खाते आहे.

लॉकडाऊनमुळे नाका तोंडात पाणी गेले

लॉकडाऊनमुळे लोकांच्या नाका तोंडात पाणी गेले आहे. यामुळे आता निर्बंध कमी करण्याची मागणी होत आहे. हळूहळू आम्ही सर्व सुरु करत आहोत. जनजीवनावर पुर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.

सार्वजनिक वाहतूक का तोट्यात

सार्वजनिक सेवा सर्वत्र तोट्यात असते. मुंबईतील ‘बेस्ट’सुद्धा तोट्यात येणार आहे. यामुळे आपणास नाशिकमध्ये हा तोटा सहन करण्याची तयारी ठेवले पाहिजे. बस तोट्यात जाण्याचे एक मोठे कारण स्थानिक राजकारण आहे. कारण नगरसेवक म्हणतो, माझ्या घरासमोरुन बस गेली पाहिजे. मग तेथे बसणारे चार लोक असले तरी चालते. यामुळे बस तोट्यात जातात. वाहतूक व्यवस्थेत आधुनिकपणा आला पाहिजे. लंडनमध्ये थोडे इंग्रजी येणाऱ्या व्यक्तीही लोकमधून सहज प्रवास करु शकतो. तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान या बसमध्ये वापरत आहात, ते काळाची गरज आहे. स्वस्त सार्वजनिक वाहतूक नागरिकांना उपलब्ध करुन दिली पाहिजे. यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होईल.

डिझेल दरवाढीवरुन तोटा

आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे भुजबळ यांनी कोटी केले. सीएनजी व इलेक्ट्रीक बस सुरु होत आहे. कारण डिझेल स्वस्त झाले आहे, असा टोला केंद्र सरकारवर केले.

नाशिकचे महत्व हवामानामुळे जास्त वाढले आहे. नाशिकचा विकास आपला एकच झेंडा असला पाहिजे. नाशिकच्या विकासासाठी रस्ते व वाहतून मार्गासाठी सुविधा करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. शासकीय वैद्यकीय कॉलेज सुरु केले आहे? समुद्धी महामार्गाचे कनेक्शन दिले आहे? अजूनही शहराला जे पाहिजे ते दिले जाणार आहे. सर्व मिळत असल्याने नाशिककरांनी आता आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असे सांगत सुविधांबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव भुजबळ यांनी करुन दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com