माझी कारवाई योग्यच; राणेंना २ सप्टेंबरला नाशिकला यावंच लागेल

माझी कारवाई योग्यच; राणेंना २ सप्टेंबरला नाशिकला यावंच लागेल
दीपक पांडेय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister) यांच्या सहकार्याची भूमिका असल्याने आपण त्यांचा आदर करतो. त्यांना नाशिक पोलिसांकडून (Nashik City Police) नोटीस बजावण्यात आली असून त्यांना २ सप्टेंबर रोजी नाशिकला (Nashik) हजर राहावे लागणार आहे. माझे ज्ञान अल्प आहे तर विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांचे ज्ञान अफाट आहे. त्यामुळे कायद्याचा आधार घेऊन आणि नाशकात तक्रार दाखल झाली म्हणून नाशिकला गुन्हा दाखल केल्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik City Police Deepak pandey) यांनी स्पष्ट केले...

आज नाशिक पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत (City Police commissioner Deepak Pandey) पोलीस आयुक्त पांडेय माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, आमची टीम केंद्रीय मंत्रीमहोदयांच्या अटकेसाठी गेली होती. ही टीम संगमेश्वर (Sangameshwar) येथे पोहचली तेव्हा त्यांना समजले रायगड पोलीस (Raigad Police) घेऊन गेले होते. दरम्यान, सुनावणी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. न्यायालयात नाशिक पोलिसांनी भूमिका जाहीर केली आणि 2 सप्टेंबर रोजी हजर राहण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार त्यांनी यायचे आहे.

मंत्री महोदयांच्या सहकार्याची भूमिका असल्याने आम्ही त्याचा आदर करतो. सीआर ३०/२१ मध्ये जे कलम आहेत, त्यानुसार आरोपीला गुन्ह्याबद्दल पुरावे दाखल करावे लागतात. त्याबाबत त्यांनी जर सहकार्य केले नाही तर कारवाई करण्यात येईल असेही पोलीस आयुक्त पांडेय (City Police Commissioner Deepak Pandey) यांनी सांगितले.

नाशिक पोलिसांनी जी नोटीस बजावली आहे त्यावर मंत्र्यांनी सही देखील केली आहे. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर नियमानुसार त्यानुसार अटक होऊ शकते. मंत्री तपासाच्या सोबत आहेत, आम्ही समाधान असल्याचे पांडेय म्हणाले.

विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांना खूप ज्ञान आहे माझं अल्प ज्ञान आहे; त्यानुसार मी कायद्याला धरून नोटीस काढली आहे. संबंधित महोदय 226 227 खाली ते आदेश खारीज करू शकतात. मात्र, मी माझ्या आदेशावर ठाम असल्याचे पांडेय म्हणाले.

मंत्रीमहोदयना आता आपण बोलावले आहे. अटक करण्याची कुठलीही स्पर्धा नाही. वातावरण तापू नये म्हणून कारवाईसाठी पावले उचलली आहेत.

यामागचा हेतू एवढंच होता की दोन संविधानिक पदावर असलेल्या विषयानुसार भविष्यात काही अनुचित घडू नये यासाठी आपण अटक करत होतो. मात्र, न्यायालयात त्यांनी पुन्हा असे होणार नाही असे कोर्टात सांगून दिले आहे. आपले पथक गेले होते; त्यांच्यावर मी समाधानी असल्याचेही पांडेय म्हणाले. (CP Deepak Pandey)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com