नाशिक महानगरपालिका राज्यात प्रथम

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नगर विकास दिनाच्या निमित्ताने सन 2022-23 मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक महानगरपालिकेला प्रथम क्रमांक देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्ग महानगरपालिका या गटातून नाशिक महानगरपालिकेस प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नाशिक महानगरपालिकेने विशेषता विक्रमी कर संकलन, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाची (एनयूएलएम)यात अव्वल कामगिरी केली आहे. तसेच कमी केलेला प्रशासकीय खर्च यामुळे मनपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

प्रत्यक्षात या आर्थिक वर्षात कर वसुलीचे उद्दिष्ट 150 कोटी होते. नाशिक मनपाच्या इतिहासात प्रथमच 125 टक्के वसुली केली आहे. मालमत्ता कराच्या रुपाने मनपाच्या तिजोरीत 188 कोटी 73 लाख रुपये इतका महसूल जमा झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मुंबईतील नगर विकास विभागाच्या या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह मनपा उपायुक्त (एनयूएलएम विभाग) करुणा डहाळे उपस्थित होत्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *